www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘आदर्श’ घोटाळ्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांना सीबीआयनं क्लीन चीट दिलाय. पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलंय. या प्रकरणातून सीबीआयनं क्लीन चीट दिल्यानं निश्चितच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना दिलासा मिळालाय.
आदर्श प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून फायदा मिळवलाय, तेही या प्रकरणातील एक आरोपी आहेत, असं सांगत आदर्श घोटाळ्यात चव्हाणांचं नाव वगळण्यास आक्षेप घेणाऱ्या सीबीआयनं सुशीलकुमार शिंदे यांना मात्र क्लीन चीट दिलीय.
महत्त्वाचं म्हणजे, आदर्श आयोगासमोर साक्ष देताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विलासराव देशमुखांकडे बोट दाखवलं होतं. ‘आदर्श सोसायटीसाठी जागा देण्याचा निर्णय आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. आदर्शसाठीचं लेटर ऑफ इंटेन्ट १८ जानेवारी २००३ ला मंजूर झालं होतं, त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. मी फक्त सही केली’ असं शिंदे यांनी म्हटलं होतं.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.