सीबीआय

मनमोहन सिंहांच्या चौकशी मागे सरकार नाही : केंद्र

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची सीबीआय चौकशीमागे केंद्र सरकारचा कोणताही हात नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. कॉंग्रेसचा बदला घेण्यासाठीच ही चौकशी करण्यात आल्याचा आरोपही सरकारने फेटाळून लावला आहे.

Jan 21, 2015, 08:03 PM IST

कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहनसिंह यांची चौकशी?

कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची चौकशी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंह यांची दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडून चौकशी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Jan 20, 2015, 10:25 PM IST

'टोल'वाल्या 'आयआरबी'वर 'सीबीआय'ची धाड

टोल नाक्यांची कंपनी आयआरबी कंपनीवर सीबीआयने धाड टाकली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी, आयआरबी कंपनी संशयाच्या भोवऱ्यात आहे.

Jan 5, 2015, 04:31 PM IST

सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट

भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोठा दिलासा मिळालाय. सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टानं अमित शाह यांना क्लीन चिट दिलीय.

Dec 30, 2014, 08:07 PM IST

कोळसा घोटाळा: माजी पंतप्रधानांची चौकशी होण्याची शक्यता

कोळसा घोटाळाप्रकरणी तत्कालीन कोळसामंत्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्यात यावा असा आदेश विशेष न्यायालयानं सीबीआयला दिला आहे. 

Dec 16, 2014, 06:22 PM IST

केंद्राकडून सीबीआयचा गैरवापर : तृणमुलचा आरोप

केंद्र सरकारकडून गैरवापर करण्यात येत असल्याची, टीका तृणमुल काँग्रेसच्या खासदारांनी केली आहे.  शारदा गैरव्यवहार प्रकरणात पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्रा यांना अटक करण्यात आली आहे, या प्रकरणी संसदेबाहेर तृणमुलच्या खासदारांनी निदर्शने केली. 

Dec 15, 2014, 11:47 PM IST

शारदा चिट फंड घोटाळा : पश्चिम बंगालचे वाहतूक मंत्र्यांना अटक

पश्चिम बंगालमधील ममता बॅनजी सरकारमधील आणि तृणमूल काँग्रेसचे वाहतूक मंत्री मदन मित्रा यांना शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली. हा ममता यांना जोरदार झटका मानण्यात येत आहे.

Dec 12, 2014, 06:46 PM IST

अनिल सिन्हा सीबीआयचे नवे संचालक

आयपीएस अनिल कुमार सिन्हा यांची सीबीआयच्या संचालकपदावर नेमणूक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायधीश एच.एल. दत्तू आणि विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सिन्हा यांची संचालक पदावर नेमणूक केली आहे.  

Dec 3, 2014, 09:48 AM IST

...तर जवखेडा हत्याकांडाचा तपास CBI कडे - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जवखेडाला अचानक भेट दिली. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांना गाफील ठेवून त्यांनी हा दौरा केला. तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगतानाच वेळ पडल्यास तपासाची सूत्रं CBIकडे दिली जातील, असं ते यावेळी म्हणाले.  

Nov 30, 2014, 03:17 PM IST

टूजी घोटाळा : सीबीआय अध्यक्षांची हकालपट्टी!

सीबीआयचे डायरेक्टर रणजीत सिन्हा यांना आज फार मोठा दणका मिळाला. सिन्हा यांनी टूजी घोटाळ्याच्या चौकशीतून दूर व्हावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Nov 20, 2014, 08:49 PM IST