IPL ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रचला इतिहास, रणजी ट्रॉफीत घेतले 10 पैकी 10 विकेट्स

Anshul Kamboj 10 Wickets In Ranji Trophy : हरियाणाच्या अंशुल कांबोजने केरळ विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये 10 विकेट घेतले. रणजी ट्रॉफी सामन्यात असा पराक्रम करणारा अंशुल हा तिसरा गोलंदाज ठरला. 

पुजा पवार | Updated: Nov 15, 2024, 03:24 PM IST
IPL ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रचला इतिहास, रणजी ट्रॉफीत घेतले 10 पैकी 10 विकेट्स   title=
(Photo Credit : Social Media)

Anshul Kamboj 10 Wickets In Ranji Trophy : रणजी ट्रॉफी 2024-25 ही स्पर्धा सुरु असून यात हरियाणा विरुद्ध केरळ सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाज अंशुल कांबोज (Anshul Kamboj) याने इतिहास रचला आहे. हरियाणाच्या अंशुल कांबोजने केरळ विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये 10 विकेट घेतले. रणजी ट्रॉफी सामन्यात असा पराक्रम करणारा अंशुल हा तिसरा गोलंदाज असून त्याने तब्बल 39 वर्षांनी रणजीमध्ये ही कामगिरी केलेली आहे. 

हरियाणाच्या चौधरी बन्सीलाल क्रिकेट स्टेडियमवर रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणा विरुद्ध केरळ यांच्यात सामना सुरु आहे. शुक्रवारी या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी केरळचा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करत होता. यावेळी वेगवान गोलंदाज अंशुल कांबोजने तिसऱ्या दिवसाचा खेळ 8 विकेट्सने सुरु केला त्यानंतर पुढच्याच तीन ओव्हरमध्ये अंशुलने दोन विकेट्स घेतले. रणजी ट्रॉफीमध्ये त्याचे हे आतापर्यंतचे जबरदस्त प्रदर्शन होते. 

10 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज : 

रणजी ट्रॉफीमध्ये आतापर्यंत अंशुल कांबोजपूर्वी केवळ दोन गोलंदाजांना एका इनिंगमध्ये 10 विकेट घेणं शक्य झालं होतं. यापूर्वी गोलंदाज प्रेमांगसू चटर्जी (1957-58) ने आसाम विरुद्ध खेळताना 10 धावा देऊन 20 विकेट्स घेतले होते. राजस्थान के प्रदीप सुंदरम (1985-86) ने विदर्भ विरुद्ध खेळताना 78 धावा देऊन 10 विकेट घेतले. अंशुल कांबोजने आता ३९ वर्षांनी अशी कामगिरी करून या लिस्टमध्ये जागा मिळवली आहे. अंशुल कांबोजच्या या गोलंदाजीमुळे हरियाणाच्या संघ या सामन्यात मजबूत स्थितीत आहे. 

हेही वाचा : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचपूर्वी स्टार फलंदाजाला दुखापत

 

मुंबई इंडियन्सचा धाकडं गोलंदाज : 

अंशुल कांबोज याने मुंबई इंडियन्सकडून 2024 च्या आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.  त्याने मुंबई इंडियन्सकडून 3 सामने खेळले असून यात त्याने आतापर्यंत 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर अंशुलने टी 20 क्रिकेटमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र अंशुलला मुंबईने आयपीएल 2025 साठी रिटेन केलं नाही. मात्र रणजी ट्रॉफीमधील अंशुलचा परफॉर्मन्स पाहता आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर अनेक संघ बोली लावू शकतात.