कोलगेट प्रकरणी खासदार विजय दर्डा यांच्यावर समन्स

कोलगेट घोटाळ्याप्रकरणी राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा आणि इतर तिघांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांना येत्या २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यासंबंधी समन्स जारी केलंय. न्या. मधू जैन यांनी यासंबंधीचा आदेश दिला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 8, 2014, 05:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
कोलगेट घोटाळ्याप्रकरणी राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा आणि इतर तिघांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांना येत्या २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यासंबंधी समन्स जारी केलंय. न्या. मधू जैन यांनी यासंबंधीचा आदेश दिला.
विजय दर्डा, त्यांचे चिरंजीव देवेंद्र दर्डा, नागपूर इथल्या एएमआर आयर्न अॅलण्ड स्टील प्रा. लिमिटेड आणि त्यांचे संचालक मनोज जयस्वाल यांना समन्स जारी करण्यात आले. सीबीआयनं गेल्या २७ मार्च रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात या सर्वजणांनी गैरमार्गानं कोळसा खाणी आपल्या ताब्यात घेतल्या, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये या सर्वाविरोधात आरोप ठेवल्याचं स्पष्ट करण्यात आलं. `एएमआर आयर्न अॅपण्ड स्टील` कंपनीने अर्ज दाखल केल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यासंबंधी आपले उत्तर दाखल करण्यासाठी सीबीआयने आणखी अवधी मागितला आहे. `एएमआर आयर्न अॅाण्ड स्टील` कंपनीच्या वतीने अॅठड. विजय अग्रवाल यांनी बाजू मांडली. सीबीआयने या प्रकरणाचा योग्य तपास केला नसून

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.