दाभोलकरांच्या हत्येच्या तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.

Updated: May 9, 2014, 04:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.
या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरु असला तरी यामध्ये काहीच प्रगती झाली नसल्याचं राज्य सरकारनं कोर्टात काल मान्य केलं. मध्य प्रदेश आणि गोवा या दोन राज्यातही या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
तसंच सीबीआयकडे यापूर्वीच भरपूर प्रकरणं असल्याचा युक्तीवाद राज्य सरकारनं केला. तर सीबीआयच्या केंद्रीय अधिका-यांनी मागच्या सुनावणीच्यावेळी या प्रकरणाचा तपास करण्यास अनुकुलता दाखवली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.