www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘सीबीआय’चे संचालक रंजीत सिन्हा यांनी ‘बलात्कारा’वर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सगळीकडून टीका झाली. त्यानंतर मात्र त्यांना यावर स्पष्टीकरण देण्याची उपरती सुचलीय.
रंजीत सिन्हा यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना आपण महिलांचा आदर करतो, असं म्हटलंय. ‘आपण केलेल्या वक्तव्यांचा दुसरा अर्थ काढला गेलाय... माझ्या म्हणण्याचा असा अर्थ अजिबात नव्हता’ असं त्यांनी आता म्हटलंय. ‘बलात्कार रोखू शकत नसाल तर त्याचा आनंद घ्या’ असं वक्तव्य रंजीत सिन्हा यांनी एका पत्रकार परिषदेत केलं होतं.
‘जर तुम्ही खेळातल्या सट्ट्यावर बंदी आणू शकत नसाल तर हे, तुम्ही बलात्कार रोखू शकत नसाल तर त्याचा आनंद घ्या, असं म्हणण्याप्रमाणे आहे’ असं सिन्हा यांनी म्हटलंय. सिन्हा यांच्यासारख्या वरीष्ठ पदावरील व्यक्तीनं अशी वक्तव्य केल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय होती.
सिन्हा यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीका केलीय. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी ‘रंजीत सिन्हा यांचं हे वक्तव्य कोणत्याही पद्धतीनं स्वीकारण्या योग्य नाही’ असं सांगत ‘सिन्हासारख्या वरीष्ठ पदावरील व्यक्ती एवढ्या सहजरित्या असा घृणास्पद वक्तव्य करूच कसं शकतात’ असा प्रश्नही विचारला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.