शरद पवार

श्वेतपत्रिकेवरून शरद पवारांची मुख्यमंत्र्याशी चर्चा

सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला आणखी एक दणका दिलाय. जलसंपदा खात्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रकल्पातील गैरव्यवहाराची माहिती पहिल्यांदा समोर आणणाऱ्या वडनेरे समितीच्या शिफारशीनुसार ही चौकशी होणार आहे.

Oct 6, 2012, 11:01 PM IST

राज्यपालांकडून अजित पवारांचा राजीनामा मंजूर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा राज्यपाल शंकर नारायणन यांनी मंजूर केला. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजभवनमध्ये भेट घेवून पवारांचा राजीनामा सादर केला.

Sep 29, 2012, 11:09 AM IST

राजकारण काका-पुतण्यांचं!

पवार आणि ठाकरे या दोन नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतय. कधी राज ठाकरे चर्चेत असतात तर कधी अजित पवार... मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे अजित पवारांकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. त्याचवेळी अजित पवार हे राज ठाकरेंच्या मार्गावर तर नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली गेली. पण घडतंय काही वेगळचं...

Sep 27, 2012, 11:45 PM IST

राजीनामा विषय संपला - शरद पवार

राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याच्यावर आता पडदा पडल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. राजीनाम्याचा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कधीच संपला आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

Sep 27, 2012, 01:47 PM IST

शरद पवार आणि गडकरींचं साटंलोट?

एका विरोधी पक्षाच्या अध्यक्षाचं शरद पवार य़ांच्याशी साटंलोट असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय.

Sep 27, 2012, 01:20 PM IST

दादांचा राजीनामा काकांनी स्वीकारला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय भूकंप झाला. त्यामुळे सरकार जाणार की राहणार याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला कोणताही धोका नाही, असे आधीच स्पष्ट केले होते. मात्र, आज अजित पवारांचा राजीनामा काका शरद पवार यांनी स्वीकारला आणि राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे.

Sep 27, 2012, 12:22 PM IST

दादा-बाबांच्यामध्ये दरी, फोन घेण्यास टाळाटाळ

अजित पवार हे गेल्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संपर्कातच नव्हते,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांत अजितदादांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा फोनच उचलला नव्हताही अशी माहिती आहे.

Sep 26, 2012, 01:11 PM IST

‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारण्याचं धाडस दाखवावं’

`मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या दबावतंत्राला बळी पडू नये... खरोखरच राजीनामा देण्याचं अजित पवारांनी दाखवलं असेल तर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा स्वीकारण्याचं धाडस दाखवावं`

Sep 25, 2012, 08:19 PM IST

मंत्र्यांचे राजीनामे दबावाची खेळी नाही - शरद पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादीमध्ये तर आता दादांच्या राजीनाम्याचा दुसरा अंक सुरू झालाय. राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेत.

Sep 25, 2012, 07:42 PM IST

अजित पवारांच्या राजीमान्याचं कारणं काय?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तडकाफडकी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. जलसंपदा खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्याचे कारण देऊन पवार यांनी राजीमाना दिला आहे.

Sep 25, 2012, 07:14 PM IST

आघाडी सरकारला धोका नाही- शरद पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादींच्या आमदारांची मागणी मान्य न करता, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Sep 25, 2012, 06:44 PM IST

नेमके काय आरोप झालेत दादांवर...

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय... पण त्यांनी हा राजीनामा का दिला? काय झाले होते त्यांच्यावर आरोप... कुणी केले होते हे आरोप... टाकुयात, या सर्व मुद्द्यांवर एक नजर...

Sep 25, 2012, 05:34 PM IST

दादांची ‘झटपट’ कार्यपद्धती अंगलट!

जलसंपदामंत्री असताना अजित पवारांनी अवघ्या तीन महिन्यांत सर्व नियम डावलून २० हजार कोटींच्या निधीचं वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या प्रकरणी भाजपनं चौकशीची मागणी केलीय.

Sep 24, 2012, 11:02 PM IST

पवार आणि मुख्यमंत्री भेटणार चिदम्बरम यांना

सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अर्थमंत्री पी चिंदंबरम यांना भेटणार आहेत.

Sep 24, 2012, 04:20 PM IST

जिल्हा बँका वाचवण्यासाठी पवारांचा पुढाकार

आर्थिक अडचणीमुळे बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या राज्यातल्या सहा जिल्हा बँका वाचविण्यासाठी आता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी पुढाकार घेतलाय. या मुद्द्यावर पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.

Sep 22, 2012, 01:31 PM IST