www.24taas.com, नवी दिल्ली
आर्थिक अडचणीमुळे बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या राज्यातल्या सहा जिल्हा बँका वाचविण्यासाठी आता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी पुढाकार घेतलाय. या मुद्द्यावर पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. नागपूर, वर्धा, बुलढाणा, जालना, उस्मानाबाद आणि धुळे-नंदूरबार या सहा जिल्हा बँका अडचणीत आलेल्या असून, रिझर्व बँकेच्या कारवाईतून वाचवण्यासाठी या बंकाना 551 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेऊन अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकांबाबत चर्चा केली. नागपूर, उस्मानाबाद, जालना, बुलडाणा आणि धुळे-नंदूरबार या जिल्हा बँका अडचणीत सापडल्यात. त्यामुळे काही बँकांनी ठेवी घेणं थांबवलंय.
राज्या शिखर सहकारी बँकेप्रमाणेच या अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकांनाही बेल आऊट पॅकेज दिलं जावं, अशी मागणी होऊ लागलीये. या बँकांच्या आर्थिक हालाखीमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचणी येतायत. जिल्हा बँकांतून पगार होणारे सरकारी कर्मचारी, शिक्षक यांचीही यामुळे अचडण होतेय...