www.24taas.com, मुंबई
सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला आणखी एक दणका दिलाय. जलसंपदा खात्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रकल्पातील गैरव्यवहाराची माहिती पहिल्यांदा समोर आणणाऱ्या वडनेरे समितीच्या शिफारशीनुसार ही चौकशी होणार आहे. तब्बल जलसंपदा खात्यातल्या तब्बल 45 अधिका-यांची विभागीय चौकशी होणार आहे.
शरद पवारांनी अजित पवार, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि रामराजे निंबाळकर यांच्याशी चर्चा केलीय. श्वेतपत्रिकेसंदर्भात त्यांनी चर्चा केल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. तसंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जलसंपदा मंत्रि सुनिल तटकरे, रामराजे निंबाळकर यांच्याशीही चर्चा केली. शरद पवारांबरोबर सिंचनाच्या श्वेतपत्रिकेबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होतेय.