शरद पवार मंत्र्यांना घालतायेत पाठिशी?
कॅगच्या अहवालात राज्य़ातल्या हेवीवेट मंत्री आणि नेत्यांवर ताशेर ओढण्यात आले आहेत. पण केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र या मंत्र्यांची पाठराखण केली आहे. ,
Apr 8, 2012, 01:01 PM ISTशरद पवारही झाले असते पंतप्रधान- अण्णा
शरद पवारांविषयी आपल्या मनात कोणताही राग नाही. यशवंतराव चव्हाणांचं अनुकरण पवारांनी केलं असतं तर कदाचित तेही पंतप्रधान झाले असते. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.
Apr 5, 2012, 11:52 AM ISTशरद पवारांच्या रडारावर राज्यपाल, मुख्यमंत्री
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्यपालांना फटकारले आहे. तर मजुरांसोबत बसून जेवण केले म्हणजे विकासाचे प्रश्न सुटत नाही, असे म्हणत पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला आहे
Apr 4, 2012, 10:09 PM IST'लवासा'चा गुन्हा, सरकारला लावला करोडोंचा चुना
लवासा कार्पोरेशननं राज्य सरकारलाही ४८ कोटींचा चुना लावल्याचं आता स्पष्ट झालंय. बेकायदा उत्खनन करुन लवासानं १६ कोटींचा महसूल बुडवल्याचं राज्य सरकारनंही मान्य केलंय.
Mar 30, 2012, 09:41 PM ISTआघाडीत बिघाडी?
पवारांच्या वक्तव्याला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. पुढच्या निवडणूकीत आघाडी ठेवायची की नाही याचा विचार करु, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलाय.
Mar 24, 2012, 10:08 PM ISTमोदी-पवार नव्या राजकीय समीकरणाचे संकेत
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी लवासाला अचानक दिलेली भेट. तसचं लवासाचे प्रवर्तक हिंदुस्थान कन्स्ट्रकशन कंपनीला (एचसीसी) गुजरातमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी दिलेल्या आमंत्रणामुळे महाराष्ट्र प्रदेश भाजपला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Mar 22, 2012, 09:29 PM ISTशरद पवार नीच माणूस – बाळासाहेब ठाकरे
नाशिकमध्ये शरद पवारांचा हलकटपणा दिसून आला. या निच माणसाने घालच्या स्तरावरील राजकारण केलं आहे, अशी बोचरी टीका करताना याला आम्ही कधीही माफ करणार नाही, असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला.
Mar 17, 2012, 11:21 PM IST...अन् लोकसभेत शरद पवारांना आली चक्कर
लोकसभेच्या अधिवेशन सुरूवात झाली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच लोकसभेत भाषण करताना केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना चक्कर आली. लोकसभेचे कामकाज सुरू असताना शरद पवार यांना चक्कर आली.
Mar 13, 2012, 12:49 PM ISTकापसाबाबत निर्णयास विलंब - शरद पवार
कापसावरील निर्यातबंदी लवकरच उठवली जाण्याचे संकेत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले आहेत. कापसाच्या निर्यातबंदीच्या निर्णयाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा खळबळजनक आरोप शरद जोशींनी केला होता त्याला प्रत्युत्तर देताना हे पोरकटपणाचे आरोप असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. काही राज्यांमध्ये निवडणुका सुरु असल्याकारणाने निर्णय घेण्यात विलंब झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Mar 10, 2012, 07:52 PM ISTलवासाला शरद पवार देणार अभय
लवासा प्रकरणी आज केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी लवासाचे प्रमुख अजित गुलाबचंद यांच्यासह मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीमागची नक्की कारणं कळली नसली तरी लवासाविरोधातील कारवाई थांबवण्यासाठी पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मध्यस्थी केल्याची चर्चा आहे.
Mar 9, 2012, 09:46 PM ISTसत्तेसाठी राष्ट्रवादीला सुचले शहाणपण!
महापालिका आणि झेडपी निवडणुकीत एकमेकांची उणीदुणी काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आता शहाणपण सुचलंय.... महापालिका आणि झेडपीच्या सत्तेसाठी ठिकठिकाणी काँग्रेसशी जुळवून घेण्याची तयारी राष्ट्रवादीनं केलीय...
Feb 20, 2012, 09:02 PM ISTपवारांचा सेनेला छुपा पाठिंबा? - राज
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिवसेनेला मदत केली की नाही हे तपासून पाहावे लागेल. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने दुसऱ्याला मागून सपोर्ट दिला की काय? हेही तपासून पाहायला पाहिजे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी सांगितले. या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विजय झाला की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला याचेही अॅनालिसिस करावे लागेल, असा चिमटा राज यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना काढला.
Feb 17, 2012, 04:36 PM ISTरिकाम्या खुर्च्यांमुळे पवारांची सभा रद्द
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येच शरद पवारांची सभा रद्द झाली आहे. पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी सांगता सभा होणार होती. तशी घोषणाही करण्यात आली.
Feb 15, 2012, 10:38 AM ISTपवारांना कोंबडी, तंगड्यांशिवाय काही दिसत नाही - उद्धव
शरद पवारांना आजकाल कोंबडी आणि तंगड्यांशिवाय काही दिसत नाही असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला. सोनेरी कोंबडी कलानगरच्या खुराड्यातून बाहेर काढा याला प्रत्युत्तर देताना उद्धव यांनी शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतला.
Feb 11, 2012, 11:56 AM ISTशिवसेनेचं लक्ष सोन्याच्या अंड्यांवर- पवार
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असताना शिवसेनेचे नेते मात्र मुंबईतच बसून होते. मुंबई ही शिवसेनेसाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असून या सोन्याच्या अंड्यावर शिवसेनेचं लक्ष असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे.
Feb 10, 2012, 01:43 PM IST