मंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार
मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.
Jun 22, 2012, 04:17 PM ISTपृथ्वीराज मी पण राज्याचा सीएम होतो- पवार
मुख्यमंत्री आणि शरद पवारांवरील कोपरखळ्या सुरुच आहेत. उद्योगधंद्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर पवारांनी पुण्यात टोला लगावला आहे. उद्योगधंद्याविषयी जे बोललो ते चुकीचं नाही.
Jun 16, 2012, 07:28 PM ISTममता पाठिंबा देतील, प्रणवदा विजयी भव- शरद पवार
राष्ट्रपतींच्या उमेदवाराबाबत ममता बॅनर्जी जास्त टोकाची भुमिका घेणार नाहीत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते.
Jun 16, 2012, 06:13 PM ISTपवार-चव्हाणांमध्ये तू तू... मै मै
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसमध्ये मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उडी घेतली आहे. पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय. तर मुख्यमंत्र्यांनीही पवारांच्या टीकेला चोख उत्तर दिलंय.
Jun 3, 2012, 08:43 AM ISTमुख्यमंत्र्यांचे पवारांना टोले...
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेला कलह वाढतच चालल्याचं दिसतंय. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवार यांचे नाव न घेता टोले लागवले.
May 14, 2012, 07:35 PM ISTमुख्यमंत्र्यांनी साहेबांना केले टार्गेट
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली असली तरी त्यांच्या निशाण्यावर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार असल्याचे दिसून आले आहे. निर्यातीबाबत चुकीच्या धोरणामुळं राज्याला फटका बसत असून शेतक-यांचं नुकसान होत असल्याचं चव्हाण यांनी कोल्हापूर येथे सांगितले.
May 12, 2012, 03:46 PM ISTमहाराष्ट्रासाठी कोणीही एकत्र येत नाही- पवार
दुष्काळाच्या मुद्यावर सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत कृषीमंत्री शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. शरद पवारांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
May 9, 2012, 11:49 AM ISTशरद पवार यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल
सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. आघाडी सरकार चालवणं ही एक कला आहे. आम्ही 1978 साली आघाडी सरकार चालवलं, पण कुरघोडी केली नाही. तसंच केंद्रात आम्ही सात आठ वर्षं एकत्र आहोत, पण एकमेकांवर कुरघोड्या केल्या नाहीत.
May 5, 2012, 07:09 PM ISTनवा जमीन घोटाळा, पुन्हा पवारांचाच गोतावळा!
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या कुटुंबियांवर पुन्हा एकदा जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप होतोय. जिल्हाधिका-यांचा बनावट आदेश तयार करून महार वतनाची जमीन लाटल्याचा आरोप शर्मिला पवार यांच्यावर करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या शर्मिला पवार या पत्नी आहेत.
May 4, 2012, 07:18 PM ISTकापूस निर्यातीवरील बंदी मागे
केंद्र सरकारने कापूस निर्यातीवर घातलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय कॅबिनेटच बैठकीत घेतला. त्यामुळे यंदा कापसाची विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ११५ लाख गाठींची निर्यात झाली आहे. आता आणखी २० लाख गाठींची निर्यात करण्यात येणार आहे.
May 1, 2012, 09:46 AM ISTपवारांची नाराजी : पंतप्रधानांनी बोलावली बैठक
कापूस आणि साखर निर्यात धोरणाबाबत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आज पंतप्रधानांनी कॅबिनेटची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Apr 30, 2012, 02:06 PM ISTकाळे झेंडे शरद पवारांसाठी
श्रीरामपूरमध्ये शऱद पवारांना काळे झेंडे दाखवले आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस प्रश्नावर पवारांना काळे झेंडे दाखवले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
Apr 29, 2012, 07:39 PM ISTशरद पवार भेटणार सोनिया गांधींना!
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या चर्चा करणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Apr 25, 2012, 04:34 PM ISTआम्ही भांडू पण एकत्रच नांदू- शरद पवार
दोन्ही काँग्रेसमधल्या वादावर अखेर पडदा पडल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थातल्या वादाचा राज्यात किंवा केंद्रातल्या आघाडीवर परिणाम होणार नाही असं पवार म्हणालेत. तर मुख्यमंत्र्यांनीही आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचं सांगत वादावर पडदा टाकला आहे
Apr 23, 2012, 05:37 PM ISTपालिका पॅटर्नचा आघाडीवर परिणाम नाही - शरद पवार
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी पुढची विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला एकत्रिक सामोरी जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
Apr 22, 2012, 02:09 PM IST