शरद पवार

पवारांसाठी राज ठाकरे `बच्चा`?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर काहीही प्रतिक्रिया देण्यासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नकार दिलाय.

Jan 8, 2013, 11:33 AM IST

बाळासाहेबांचं राज्याला मोठं योगदान आहे- शरद पवार

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात गैर काय, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. बाळासाहेबांचं राज्याला मोठं योगदान आहे, असंही ते म्हणाले.

Jan 7, 2013, 11:53 PM IST

पुणे मेट्रोच्या प्रकल्पाच्या ट्रॅकवर शरद पवारांची एन्ट्री

पुणे मेट्रोच्या प्रकल्पाच्या ट्रॅकवर शरद पवारांची एन्ट्री झालीय. या विषयावर सर्व पक्षांच्या गट नेत्यांची पवारांनी बैठक घेतली. मेट्रोच्या विषयात आता पवारांनी लक्ष घातल्याने, वर्षानुवर्षे रखडलेला पुणे मेट्रोचा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत...

Jan 7, 2013, 07:08 PM IST

कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे – शरद पवार

कोकणातील विकासावर भर दिला पाहीजे. कोकणच्या विकासाठी आम्ही कटीबद्द असल्याचे सांगतानाच मुंबई विद्यापीठावर मोठा ताण पडत आहे, त्यासाठी कोकणात कोकणासाठी विनाविलंब नवे विद्यापीठ व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केले.

Jan 6, 2013, 07:41 AM IST

पवारांवर काँग्रेसचा प्रतिहल्ला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वबळाच्या भाषेला काँग्रेसनंही आक्रमक उत्तर दिलंय. स्वबळावर लढून राष्ट्रवादीला विरोधात बसायचे आहे का असा खोचक सवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Jan 1, 2013, 09:18 PM IST

काँग्रेसच्या दगाफटक्यावर शरद पवार नाराज

काँग्रेसने गुजरातमध्ये केलेल्या दगाफटक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असून 2014 साली होणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.

Dec 31, 2012, 08:29 PM IST

कृषीमंत्री म्हणतात, दुष्काळामुळं उडाली झोप

माणसांना जगवायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न आहे… यंदाचा दुष्काळ गंभीर आणि झोप उडणारा’ असल्याचं भीषण वास्तव केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मांडलंय. राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या हायटेक कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते.

Dec 28, 2012, 10:35 PM IST

दादा-बाबांचे मानापमान ‘नाट्य’ तर पवारांचा तडका

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ९३वे नाट्यसंमेलन हे जणू मानापमानाचे व्यासपीठ ठरल्याचे दिसून आले. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित दादा-बाबांचे बोलनाट्य दिसले. यावेळी दादांनी मागितले आणि बाबांनी देऊन टाकले, अशी कुजबूज कवी मोरोपंत नगरीत कुजबूज ऐकायला मिळाली.

Dec 23, 2012, 09:00 AM IST

पवारांकडून फौजिया खान यांची पाठराखण

दक्षिण आफ्रिकेतल्या सफारीत रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढल्याचं उघड झाल्यानंतर विरोधक आणि वन्यजीव प्रेमींनी खान यांचा चांगलाच समाचार घेतला होता. पण, ही टीका चुकीची असून फौजिया खान यांनी काढलेल्या फोटोंमध्ये काहीही गैर नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटतंय.

Dec 15, 2012, 05:57 PM IST

एनडीएमध्ये सामिल व्हा आणि पंतप्रधान बना, पवारांना ऑफर

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय.

Dec 12, 2012, 04:50 PM IST

शरद पवार हॉस्पीटलमध्ये दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काल रात्री उशीरा ब्रीच कॅण्डी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Dec 11, 2012, 02:56 PM IST

दादांनी स्वत:लाच क्लिन चीट दिलीय का?

२५ सप्टेंबरला अजित यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा... ८ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ... केवळ ७२ दिवसांत घडलेलं हे नाट्यं...

Dec 7, 2012, 10:32 AM IST

राष्ट्रवादीचे मंत्री जाधव-तटकरे आमने-सामने

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे विश्वासू आणि कोकणातील नेते जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यातील वाद उफाळून आला आहे. जाधव यांनी तटकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, हा प्रयत्न जाधवांनाच अडचणीत आणणारा ठरण्याची शक्यता आहे.

Dec 6, 2012, 04:21 PM IST

पवारकाका आले पिंपरीमध्ये, पण अजितदादा आहेत कुठे?

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात आज दस्तुरखुद्द शरद पवार यांनी कित्येक वर्षानी पाऊल ठेवलं. गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड शहराचा कारभार छोटे पवार पाहत आहेत. शरद पवार यांचा कार्यक्रम असताना अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळं अपेक्षेप्रमाणं बरेच प्रश्न निर्माण झाले.

Dec 2, 2012, 08:27 PM IST

बाळासाहेबांशी काय बोलावं सुचलंच नाही, शरद पवार भावूक

केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्यातील मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. शरद पवार हे भेटीसाठी `मातोश्री`वर गेले होते.

Nov 15, 2012, 02:29 PM IST