काँग्रेसच्या दगाफटक्यावर शरद पवार नाराज

काँग्रेसने गुजरातमध्ये केलेल्या दगाफटक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असून 2014 साली होणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 31, 2012, 08:29 PM IST

www.24taas.com, कोची
काँग्रेसने गुजरातमध्ये केलेल्या दगाफटक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असून 2014 साली होणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोची इथे बोलताना 2014 सालच्या निवडणुकीत काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत फेरविचार करू, असा इशाराच काँग्रेसला दिला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली होती. गुजरातमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला नऊ जागा आल्या होत्या. यातील पाच जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते, तर उर्वरित जागांवर काँग्रेसचे बंडखोर उभे राहिले होते.
काँग्रेसच्या या दगाबाजीने शरद पवार दुखावले गेले असून आता काँग्रेससोबतच्या आघाडीचा फेरविचार करण्याची वेळ आल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय.