www.24taas.com, मुंबई
२५ सप्टेंबरला अजित यांनी दिला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा... ८ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ... केवळ ७२ दिवसांत घडलेलं हे नाट्यं...
सिंचन घोटाळ्यावरून केवळ विरोधकांनी टीका केली म्हणून राजीनामा देणारे अजित पवार आता का म्हणतायत 'विरोधक टीका करतच असतात... ',मग राजीनाम्याचा राजकीय भूकंप कशासाठी आणि कुणासाठी होता?
६० हजार कोटींचा सिंचन घोटाळा... केवळ ७२ दिवसांत हा घोटाळा जनतेच्या विस्मृतीत जाऊ शकतो का?... सिंचनाच्या श्वेतपत्रिकेचं केवळ नाटक होतं का?... केवळ विरोधकांनी टीका केली म्हणून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या दादांनी स्वत:लाच क्लिन चीट दिलीय का? राष्ट्रवादीनं अजित पवार यांना क्लिन चीट दिलीय का? या सर्व खेळामध्ये काँग्रेसचा काय रोल आहे?
नक्कीच... असे कित्येक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. तर तुम्हीही तुमचं मत मांडा... विचारा सरकारला जाब...
तुमच्या प्रतिक्रिया आम्हांला 24taas.com वर बातमी खालील प्रतिक्रियांचा बॉक्स मध्ये नोंदवा.