वाद

पर्सीनेटधारक, छोटे मच्छीमारमधील वाद उफाळला

सिंधुदुर्गामध्ये पर्सीनेटधारक आणि छोटे मच्छीमार यांच्यातला वाद आणखी चिघळलाय. याच वादातून पर्सीनेटधारकांची गाडी फोडण्यात आलीय. या प्रकरणी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा वाद राजकीय वळण घेत असल्यानं आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Oct 10, 2013, 05:30 PM IST

‘साखरे’वरुन कडवटपणा, राणे-सावंत यांच्यात जुंपली!

उद्योगमंत्री नारायण राणे आणि काँग्रेसचेच आमदार विजय सावंत यांच्यातील साखर कारखाना उभारणीवरून निर्माण झालेला वाद शिगेला पोहोचलाय.

Sep 16, 2013, 11:31 AM IST

`...तर माझ्या मुलीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं असतं`

‘आपल्या मुलीने विवाहपूर्व शरीरसंबंध प्रस्थापित केले असते तर तिला पेट्रोल टाकून पेटवून दिलं असतं’ असं भयानक विधान करून आरोपींचे वकील ए. पी. सिंग आणखी एक वाद ओढवून घेतलाय.

Sep 15, 2013, 09:16 AM IST

मोदी-अडवाणी संघर्षाचं मूळ : पाकिस्तान दौरा

भाजपमध्ये सध्या नरेंद्र मोदी विरुद्ध लालकृष्ण अडवाणी असा थेट संघर्ष पहायला मिळतोय. पण, या संघर्षाचं मूळं २००५ मधील अडवाणींच्या पाकिस्तान दौऱ्यात दडलीत.

Sep 13, 2013, 02:01 PM IST

असा कसा हा `आसाराम`?

आसाराम बापू आणि वाद हे जुनंच समिकरण आहे. कधी नेते-अधिकाऱ्यांना धमक्या दे, आपल्या भक्तांना लाथा-बुक्क्यांनी मार असली कृत्य आसाराम नेहमीच करत असतात. दुष्काळ असताना पाण्याची नासाडी करून वर त्याचं समर्थनही करतात.जिच्यावर बलात्कार झाला, तिचीच चूक आहे, असा संतापजनक दावाही त्यांनी केलाय.

Sep 3, 2013, 09:24 AM IST

टीव-टीवमुळं चेतन भगत गोत्यात!

“रुपया म्हणतोय, माझ्यावर बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा होणार की नाही?” अशा स्वरुपाचं ट्विट करुन प्रसिद्ध लेखक चेतन भगत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याचं पाहून चेतन भगत यांनी ट्विट करुन रुपयाची तुलना बलात्काराशी केली. या ट्विटबाबत सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली. त्यामुळं अखेर चेतन भगत यांनी वादग्रस्त ट्विट डिलिट केलं.

Aug 29, 2013, 12:42 PM IST

सायनावर `ज्वाला`मुखी!

इंडियन बॅडमिंटन लीग आणि लिलावासंदर्भात आणखी एक वाद निर्माण झालाय. सायनानं परदेशी बॅडमिंटनपटू तौफिक हिदायतसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी ज्वाला गुट्टानं सायनावर टीकास्त्र सोडलंय.

Aug 22, 2013, 10:44 AM IST

सचिनपेक्षा लाराच श्रेष्ठ; पाकचे फुत्कार

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग या दोघांपेक्षा वेस्ट इंडिजचा ब्रायन लाराच श्रेष्ठ असल्याचं मत पाकच्या आफ्रिदीनं व्यक्त केलंय.

Aug 9, 2013, 07:08 PM IST

कुठल्या मुहुर्तावर जन्माला आलो, कळत नाही- अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वाद हे नातं फार जुनं आहेच, पण ते वारंवार समोरही येत असतं. याला अजितदादांचा सडेतोड स्वभाव जबाबदार आहे की मीडिया, हा प्रश्न आहे...

Jul 16, 2013, 12:04 AM IST

शाहरुखनं मनोज कुमारची ‘शांती’ पुन्हा भंगली!

मनोज कुमार... बॉलिवूड दिग्गजांपैकी एक अभिनेता. मनोज कुमार यांचा शांत स्वभाव सर्वांच्याच परिचयाचा. पण, आता मात्र ते शांत होण्याच्या मन: स्थितीत नाहीत. आता मात्र आपण ‘ओम शांती ओम’च्या निर्मात्यांना सहजासहजी सोडणार नाही, असा निश्चय मनोज कुमार यांनी केलाय.

Mar 19, 2013, 02:29 PM IST

विश्वरुपमच्या वादानंतर... ‘सिनेमेटोग्राफी’ कायद्यात बदल?

‘विश्वरुपम’या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्र सरकार कायद्यांत बदल करण्याचा विचार करतंय. याविषयीचे संकेत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी कायद्यात बदल करण्याचे संकेत दिलेत.

Jan 31, 2013, 12:57 PM IST

साहित्य संमेलनासाठी बेकायदा निधीचा वापर!

चिपळूण इथं होण्याऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Jan 9, 2013, 01:00 PM IST

कामरान अकमल नडला, ईशांत शर्मा भिडला

पहिल्या टी-२० मॅचमध्ये पाकिस्ताननं बाजी मारली. या मॅचमध्येही भारत-पाकिस्तान मधली टशन दिसून आली. टीम इंडियाचा ईशांत आणि पाकिस्तानचा कामराननं एकमेकांना खुन्नस दिली.

Dec 26, 2012, 07:23 PM IST

बिग बॉसच्या घरात वाइल्ड ‘मिंक’ वादळ

बिग बॉसने बॉलिवूड अभिनेत्री-मॉडेल ‘मिंक बरार’ला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याचं ठरवलंय. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याआधीच मिंकनं एक खळबळजनक वक्तव्य केलय. मिंक म्हणाली की, यंदाचा बिग बॉसचा सिझन खूपच थंड आहे. मी घरात एन्ट्री करताच अख्खं घर हादरवून टाकणार आहे.

Nov 3, 2012, 04:05 PM IST

लतादीदी खोटारड्या... रफींच्या मुलाचा आरोप

एका वृत्तपत्रात लतादीदींनी दिलेल्या मुलाखतीनंतर वादाला तोंड फुटलंय. मुहम्मद रफी यांनी एकेकाळी आपल्याला लेखी माफिनामा दिल्याचं वक्तव्य लतादिदिंनी केलंय आणि त्यामुळेच सुरु झालाय एक नवा वाद...

Sep 27, 2012, 12:06 AM IST