www.24taas.com, चिपळूण
चिपळूण इंथ होण्याऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
साहित्य संमेलनाला कोकणातल्या १५ आमदारांनी आमदार निधीतून प्रत्येकी ५ लाख असे ७५ लाख रुपये दिलेत. साहित्य संमेलनाला अशाप्रकारे निधी देता येत नसल्यानं हा निधी बेकायदा ठरण्याची शक्यता आहे.
सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या कार्यक्रमांनाच प्रत्येकी दोन लाख रुपये देता येऊ शकतात, अशी तरतूद आहे. मात्र, साहित्य संमेलन हा खासगी संस्थेचा कार्यक्रम आहे. त्यामुळं दिलेला संपूर्ण निधीच बेकायदा असल्याचं स्पष्ट होतंय.