कामरान अकमल नडला, ईशांत शर्मा भिडला

पहिल्या टी-२० मॅचमध्ये पाकिस्ताननं बाजी मारली. या मॅचमध्येही भारत-पाकिस्तान मधली टशन दिसून आली. टीम इंडियाचा ईशांत आणि पाकिस्तानचा कामराननं एकमेकांना खुन्नस दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 26, 2012, 08:02 PM IST

www.24taas.com, चिन्नास्वामी स्डेडियम
पहिल्या टी-२० मॅचमध्ये पाकिस्ताननं बाजी मारली. या मॅचमध्येही भारत-पाकिस्तान मधली टशन दिसून आली. टीम इंडियाचा ईशांत आणि पाकिस्तानचा कामराननं एकमेकांना खुन्नस दिली. बंगळुरुलाच ईशांत आणि कामरानमध्ये वाद झाला. मात्र यापूर्वीही कामरानं भारतीय प्लेअर्ससोबत वाद घातलाय.
भारत पाकिस्तान मॅच म्हणजे युद्धच. दोन्ही देशातीलच नाही तर जगभारतील कोट्यावधी चाहत्यांचं लक्ष या मॅचकडे लागलेलं असतं कारण या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांच्या मॅचमध्ये क्रिकेट बरोबरच अशी चुरस पाहायला मिळते जी दुस-या तिस-या कोणत्याही मॅचमध्ये दिसत नाही. पाच वर्षांनतंर भारताच्या दौ-यावर आल्या नंतर या पहिल्याच मॅचमध्ये तीच टशन पुन्हा दिसली. कामरान अकमल आणि ईशांत शर्मा यांच्यात चांगलीच जुंपली.
भारत पाक मॅचम्हणजे मैदानात वाद होणार हे आता जवळजवळ निश्चित. बंगळुरुला झालेली टी-२० लढत आणि अपवाद ठरली नाही. नेहमी प्रमाणेच यावेळीही भारत-पाक मॅचमध्ये खडाजंगी झाली. यावेळी टीम इंडियाची बॉलर ईशांत शर्मा आणि पाकिस्तानी बॅट्समन कामरान अकमल एकमेकांसमोर उभे ठाकले आणि त्यांच्यात चांगलीच जुंपली. त्यांना शांत करण्यासाठी संपूर्ण टीम इंडिया पुढे सरसावली आणि अंपायरलाही मध्यस्ती करावी लागली.

अटी तटीच्या मॅचमध्ये ईशांत १८वी ओव्हर टाकत होता आणि कामरान अकमल पहिल्याच बॉलचा सामना करत होता. ईशांतचा हा शानदार इनस्विंग कामरान खेळू शकला नाही आणि कामरान थोडक्यात बचावला. बस्स ईशांतनं आणि कामरानमध्ये जुंपली.
दोघांनाही शांत करण्यास संपूर्ण टीम इंडिया धावली आणि दोन्ही अंपायर्सना त्यासाठी मेहनत घ्यावी लागली. तरीही ईशांतच्या डोळ्यात आग दिसत होती. कामरानवर त्याचा राग शांत झाला नाही त्याचं कारणही तसचं होतं. त्याआधीच्याच बॉलवर शोएब मलिकला ईशांतनं जाडेजाकडून कॅच आऊट केलं होतं मात्र अकमलनं अंपायरला बॉल जास्त उंच राहिला होता अशी सूचना केली आणि अंपायरनं तो नो बॉल ठरवला अर्थात याचा राग ईशांतला आला आणि पुढच्याच बॉलमध्ये अकमलही बीट झाला आणि ईशांत त्याच्यावर बरसला.

कामरान विरुद्ध टीम इंडिया हे पहिल्यांदाच झालं नाहीय तर याआधीही गंभीर आणि अकमलमध्ये जबरदस्त जुंपली होती. गंभीर आणि कामरान मैदानातच भिडले होते. तेव्हा कॅप्टन धोनी आणि अम्पायर्सनी हा वाद मैदानात सोडवला होता.
खरं तर भारतीय आणि पाकिस्तानी प्लेअर्समधील मैदानातील चकमकी चाहत्यांसाठी नव्या नाहीत, चाहते त्याचा आनंद घेतात पण नेहमीच हे वाद शांत करण्यास इतर प्लेअर्स आणि अंपायर्स यशस्वी ठरतीलच असं नाही. या शाब्दिक चकमकींनी जर पुढची पायरी गाठली तर ते दोन्ही देशांसाठी आणि एकंदर क्रिकेटसाठीही हाणी पोहोचवणारं ठरेल.