लतादीदी खोटारड्या... रफींच्या मुलाचा आरोप

एका वृत्तपत्रात लतादीदींनी दिलेल्या मुलाखतीनंतर वादाला तोंड फुटलंय. मुहम्मद रफी यांनी एकेकाळी आपल्याला लेखी माफिनामा दिल्याचं वक्तव्य लतादिदिंनी केलंय आणि त्यामुळेच सुरु झालाय एक नवा वाद...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 27, 2012, 12:06 AM IST

www.24taas.com, मुंबई
एका वृत्तपत्रात लतादीदींनी दिलेल्या मुलाखतीनंतर वादाला तोंड फुटलंय. मुहम्मद रफी यांनी एकेकाळी आपल्याला लेखी माफिनामा दिल्याचं वक्तव्य लतादिदिंनी केलंय आणि त्यामुळेच सुरु झालाय एक नवा वाद...
दिदींच्या म्हणण्यानुसार, मौहम्मद रफी आणि त्यांच्यात रॉयल्टीवरुन वाद निर्माण झाले होते. ज्यामुळे प्रकरण इतके वाढले की लता मंगेशकर यांनी मोहम्मद रफींकडून लेखी माफीनामा मागितला. मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार रफींनी लतादीदींना लेखी माफीनामाही दिला. परंतू, मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद यांनी लतादीदींच्या या वाक्यावर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात शाहिद रफी यांनी एक पत्रकार परिषदही घेतली.
आपल्या वडीलांनी लतादीदींना कधीही असा माफिनामा दिला नसून त्या धादांत खोटं बोलत असल्याचं शाहीद यांनी म्हटलंय. आठ ते दहा दिवसांत लतादीदींनी तो माफीनामा पेश करावा, असं आवाहनही शाहिद यांनी ठामपणे केलंय.