ठाकरे बंधूंमध्ये कटुता आणि गांधी बंधूंमध्ये गोडवा का वाढतोय?
गांधी घराण्यातील राहुल आणि वरूण या चुलत बंधूंमध्ये `भाईचारा` निर्माण होतोय. तर ठाकरे घराण्यातील उद्धव आणि राज यांच्यात मात्र जोरदार `भाऊबंदकी` रंगलीय. चुलतबंधूंमध्ये सुरू असलेल्या महाभारताचा लेटेस्ट एपिसोड.
Apr 3, 2014, 08:54 AM ISTमनसे-भाजपवर मुख्यमंत्र्याचा हल्लाबोल
भाजप आणि मनसेची छुपी युती असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. तर दुसरीकडे गृहमंत्री आर आर पाटील यांनी जोरदार टीका करताना दोघांची औकात दाखवून दया, अशी मतदारांना साद घालताना राज आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
Apr 3, 2014, 08:40 AM ISTराज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
`उद्धव हॉस्पीटलमध्ये असताना अलिबागचा दौरा अर्ध्यावर सोडून हॉस्पीटलमध्ये दाखल झालो होतो... घरी जाताना गाडीत त्याच्या शेजारीच बसून होतो... बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला हे तेव्हा नाही आठवलं`
Apr 2, 2014, 08:43 PM ISTशरद पवारांनी फेसबुकवर केलं राज ठाकरेंचं कौतुक
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलंय. त्यांच्या फेसबुक पेजवर पवारांनी त्यांचं मत नोंदवलंय. राज यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष निर्माण केला आणि तो वाढवला, असं पवार यांनी म्हटलंय.
Apr 1, 2014, 11:36 PM ISTस्मारकांच्या राजकारणापासून सावध राहा; राज ठाकरेंचा सल्ला
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची जुन्नरमध्ये जाहीर सभा होतेय. या सभेत राज ठाकरे यांनी शिवस्मारकावरून काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला चांगलंच फैलावर घेतलंय.
Apr 1, 2014, 08:27 PM ISTऔकात दाखवाल तर गप्प बसणार नाही - उद्धव
औकात दाखवाल तर गप्प बसणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राजला ठाकरी शैलीत सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय.
Apr 1, 2014, 07:05 PM ISTअभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत!
अभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत प्रवेश करत आहेत. आतापर्यंत राजकारणापासून दूर पळणारा नाना सिस्टिम बदलण्यासाठी अखेर राजकारणात पाऊल टाकतोय. येत्या १ मेला नाना मनसेत प्रवेश करणार आहे.
Apr 1, 2014, 01:16 PM ISTयुतीसाठी एक फोन करायचा होता - राज ठाकरे
महायुतीत मनसेला घ्यायचंच होतं, तर हा बाहेर किंवा वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेलवर चर्चा करण्याचा विषय नव्हता, असं स्पष्ट करत मला जर एक फोन केला असता तर मी चर्चा करण्यासाठी तयार झालो असतो, असे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पुण्यातील पहिल्या जाहीर सभेत आपली भूमिका स्पष्ट केली. मनसेनं आपला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. माझी अवकात काढलीत ना तर आता मी या निवडणुकीत अवकात दाखवून देईन, असे राज म्हणालेत.
Apr 1, 2014, 10:04 AM IST`मनसे`मुळेच युतीत होता तणाव, उद्धव ठाकरेंची कबुली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेमुळेच काही काळ भाजपमध्ये आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता याची कबुली दिलीय. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा अंतिम भाग आज `सामना` या शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रकाशित झाला. या मुलाखतीच्या अखेरच्या भागात जनतेच्या मनातील ‘मनसे’पासून ‘हिंदुत्वा’पर्यंतच्या अनेक प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तरे दिली आहेत.
Apr 1, 2014, 09:32 AM ISTपुण्याच्या सभेत काय म्हणाले राज ठाकरे?
पुण्यात राज ठाकरे यांची आज लोकसभेच्या प्रचारार्थ सभा झाली, या सभेत राज ठाकरे काय बोलले, यातील काही महत्वाचे मुद्दे
Mar 31, 2014, 08:57 PM ISTपाडव्याच्या मुहूर्तावर आज पुण्यात `राज`गर्जना!
मनसेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुटणार आहे. या प्रचाराची सुरुवातच पुण्यामधून होतेय. पुण्यामधील मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेतील.
Mar 31, 2014, 10:36 AM ISTराज ठाकरेंच्या शहरी भागात सभांचा धडाका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ३१ मार्चला पुण्यात होत आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. मनसेने शहरी भागात लोकसभेचे उमेदवार दिलेत. त्यामुळे शहरांमध्ये राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. यामुळे शिवसेनेला डोकेदुखी होण्याचे संकेत आहेत.
Mar 28, 2014, 12:05 PM ISTमनसेला दणका, नगरसेविकेचे पद रद्द
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका प्रियांका शृंगारे यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. विक्रोळीतील प्रभाग क्रमांक ११२ च्या नगरसेविका होत्या.
Mar 27, 2014, 05:38 PM ISTमनसेचे बाळा नांदगावकर अंतुलेंच्या भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर अंतुलेंच्या भेटीला गेले आहेत. शेकापचे जयंत पाटीलही नांदगावकरांबरोबर आहेत. आता शेकाप्रमाणेच अंतुले मनसेला पाठिंबा देणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Mar 25, 2014, 02:46 PM ISTउद्धव ठाकरे बरसले; पवार, राज यांच्यावर हल्लाबोल
शिवसेना हा ओरिजिनल म्हणजेच नवनिर्मित पक्ष आहे. तर राष्ट्रवादी हा विकाऊ आणि गद्दारांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कुठे काय मिळते काय, यावर त्यांचा डोळा असतो, अशी जोरदार टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई येथे केली. याचवेऴी शिवसेना-भाजप युती सर्व जागा जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त केला.
Mar 22, 2014, 03:51 PM IST