मनसेला दणका, नगरसेविकेचे पद रद्द

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका प्रियांका शृंगारे यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. विक्रोळीतील प्रभाग क्रमांक ११२ च्या नगरसेविका होत्या.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 27, 2014, 05:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका प्रियांका शृंगारे यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. विक्रोळीतील प्रभाग क्रमांक ११२ च्या नगरसेविका होत्या.
नगरसेविका प्रियांका शृंगारे यांनी खाटीक समाजाचे जात प्रमाणपत्र निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरताना दिले होते. या प्रमाणपत्राची जात पडताळणी समितीने चौकशी केली. या चौकशीत त्यांनी हे प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांना दिला. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई करत त्यांचे नगरसेविका पद रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आज सभागृहात मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी प्रियांका शृंगारे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याची माहिती दिली आणि त्यांचे नगरसेविका पद रद्द करण्यात आले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.