www.24taas.com, झी मीडिया, जुन्नर
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची जुन्नरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवस्मारकावरून काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं.
राज ठाकरे यांच्या या सभेला चिक्कार गर्दी दिसली तरी राज ठाकरेेंनी शिवस्मारक सोडून इतर कोणत्याही विषयाला हात न घातल्यानं ही सभा तशी थंडच राहिली.
काय म्हणाले राज ठाकरे...
* मूलभूत प्रश्न सोडवले नाही, पण पुतळ्याचे स्वप्न पडतात - राज ठाकरे
* परप्रांतियांवर भूमिका घेतल्यावर राज ठाकरे संकुचित ठरतो - राज ठाकरे
* परप्रांतीयांच्या भूमिकेत बदल नाही - राज ठाकरे
* स्थानिक भूमीपूत्रांना नोकऱ्या मिळाल्या, पुन्हा घसरले भैय्यांवर - राज ठाकरे
* शिरूरमधील एमआयडीसी काम कोण करतं , हे भैय्ये
* शिरूरमध्ये काहीच बदल झाला नाही, शहर वाढतंय पण आकार नाही - राज ठाकरे
* स्मारकांच्या राजकारणापासून सावध राहा - राज
* आढळराव पाटील शिवनेरी किल्ल्याचा प्रश्न एकदा तरी संसदेत विचारला का - राज ठाकरे
* नेपोलियनवर २ लाख २७ हजार पुस्तके, पण शिवाजी महाराजांवर २ लाख २७ हजार पाने तरी लिहिली का - राज ठाकरे
* निवडणुका आल्या की छत्रपतींची आठवण होते... निवडणुकांशिवाय दुसरा धंदा नाही
* शिवाजी राजे ही व्यक्ती नव्हती, तो एक विचार होता
* गडकिल्ले ही महाराजांची खरी स्मारकं... पण, आमच्याकडे त्यांची किंमत नाही - राज
* शिवाजी जगाला समजावून सांगता आलं नाही... शिवाजींचे पुतळे दाखवून काय होणार आहे - राज
* करायचं काहीच नाही... नुसत्याच घोषणा... निवडणुका आल्या की छत्रपतींची आठवण होते... शिवस्मारकावरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.