युतीसाठी एक फोन करायचा होता - राज ठाकरे

महायुतीत मनसेला घ्यायचंच होतं, तर हा बाहेर किंवा वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेलवर चर्चा करण्याचा विषय नव्हता, असं स्पष्ट करत मला जर एक फोन केला असता तर मी चर्चा करण्यासाठी तयार झालो असतो, असे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पुण्यातील पहिल्या जाहीर सभेत आपली भूमिका स्पष्ट केली. मनसेनं आपला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. माझी अवकात काढलीत ना तर आता मी या निवडणुकीत अवकात दाखवून देईन, असे राज म्हणालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 1, 2014, 10:14 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
महायुतीत मनसेला घ्यायचंच होतं, तर हा बाहेर किंवा वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेलवर चर्चा करण्याचा विषय नव्हता, असं स्पष्ट करत मला जर एक फोन केला असता तर मी चर्चा करण्यासाठी तयार झालो असतो, असे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पुण्यातील पहिल्या जाहीर सभेत आपली भूमिका स्पष्ट केली. मनसेनं आपला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. माझी अवकात काढलीत ना तर आता मी या निवडणुकीत अवकात दाखवून देईन, असे राज म्हणालेत.
यावेळी युतीबाबत राज ठाकरे यांनी काही गोष्टी स्पष्ट करण्यावरही जोर दिला. युतीत मनसेला घ्यायचंच होतं, तर हा बाहेर किंवा वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेलवर चर्चा करण्याचा विषय नव्हता, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केला आहे. यासाठी युतीतल्या कुणीतरी साधा फोन केला असता, आणि फोनवर बोलणी केली असती, तरी चाललं असतं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेविषयी बोलतांना राज ठाकरे म्हणाले, माझी अवकात काढणाऱ्यांना माझी अवकात मी निवडणुकीत दाखवेल, असं थेट आव्हान शिवसेनेला राज ठाकरे यांनी दिलं आहे. मी पाडण्यासाठी उमेदवार उभे केले नसल्याचंही यावेळी राज यांनी सांगितलं.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही आपल्याला संपर्क साधला होता, मात्र युती करायची कशी, नेमकं काय ठरवायचं हा विषय केला नसल्यानं अडचणी येत होत्या, असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आपण नितिन गडकरी यांना भेटलो असल्याचंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
नितिन गडकरी यांनी मनसेने एकही जागा लढवू नये असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हे मान्य करण्यासारखं नसल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. नितिन गडकरी यांच्याबद्दलचं माझं मत चांगलं आहे, कारण मुंबईत फ्लॉयओव्हर व्हावेत, हे बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न नितिन गडकरी यांनी पूर्ण केलं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांच्यावर मी टीका केली नाही, तर तो मैत्रिपूर्ण सल्ला होता, देशात कुणाचंही सरकार स्पष्टपणे येणार नाही, मात्र देशासमोरील अडचणी पाहून आपण नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना एनडीएमध्ये येऊ देणार नाही, असं म्हणणाऱ्यांनी आपला पक्ष केवढा आणि एनडीए केवढा हे पाहून बोलावं, असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे.
शिवस्मारकाला आपला विरोध नाही मात्र, शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचं संरक्षण होणं महत्वाचं आहे, गडकिल्ले सुधारण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भाषणातील ठळक बाबी
- संसदेत आवाज उठवण्यासाठी माझे खासदार पाठवायचेत
- देशात आलं तर मोदींचं सरकार येईल - राज ठाकरे
- पुणं सगळं बकाल झालंय
- काँग्रेसला उद्धवस्ता करा
- महाराजांच्या स्मारकाला विरोध नाही, पण गड किल्ल्यांचे संरक्षण करा
- शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं संवर्धन महत्वाचं
- मी पाडण्यासाठी उमेदवार दिलेले नाहीत
- निवडणूक आली की काँग्रेसवाले शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय काढतात
- मुंबईतले भूकंप इतरांना विकले, बाळासाहेबांना एकही नाही
- पवारांना एनडीएमध्ये घेऊ नये, हे बोलायला तुम्ही केवढे ?, उद्धवना टोला
- मात्र देश कठीण परिस्थितून जात असल्याने मोदींना पाठिंबा
- मुंबई गुजराथींचं माहेर हे मोदींना बोलण्याची गरज नाही
- मुंबई गुजराथी लोकांचं माहेर हे पटत नाही
- नरेंद्र मोदींवर टीका नव्हती, तो मैत्रिपूर्ण सल्ला होता
- मला कुणाचे मुखवटे घेण्याची गरज नाही
- जे असतं ते मी उघड करतो, राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
- मी मोदींबद्दल 2010 मध्ये काय बोललो, हा व्हिडीओ यू-ट्यूबवर आहे
- गुजरातमधील भाजपचं काम शिवसेनेने नाही पाहिलं, मी जाऊन पाहिलं
- शिवसेनेला राज ठाकरे यांचा थेट इशारा
- या निवडणुकीत मी माझी अवकात दाखवेल
- गडकरींनी निवडणूक न लढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता
- मुंबईतले फ्लॉयओव्हर्स हे स्वप्न बाळासाहेबांचं, पूर्ण केलं गडकरींनी
- नितिन गडकरी यांच्याबद्दलचं माझं मत नेहमीच चांगलं
- पण जागांचं काय कसं करायचं यावर चर्चा केलीच नाही
- चर्चेसाठी मुंडेंनी संपर्क साधला होता
- एकत्र येण्यासाठी एक साधा फोन केला असता
- युतीच्या चर्चेसाठी वर्तमानपत्र, चॅनेल्स माध्यमं होऊ शकत नाही
- उद्धव यांच्या टाळीच्या वक्तव्याला राज ठाकरेंचं उत्तर
- फोन केला असता तर चर्चा केली असती
- मनसेचा प्रचार नारळ पुण