www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मनसेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुटणार आहे. या प्रचाराची सुरुवातच पुण्यामधून होतेय. पुण्यामधील मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेतील.
डेक्कन इथल्या मुळा नदीच्या पात्रात राज यांची सभा संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. स्थानिक उमेदवार दीपक पायगुडे यांच्यासह, बाळा नांदगावकर, डॉ. प्रदीप पवार, अशोक खांडेभराड, अभिजित पानसे, महेश मांजरेकर आदी उमेदवार या वेळी उपस्थित राहणार आहेत.
या सभेत राज ठाकरे-नितीन गडकरी यांची काही दिवसांपूर्वी झालेली भेट त्या भेटीवर शिवसेनेच्या मुखपत्रातून झालेली टीका यावर राज काय समाचार घेणार याची साऱ्यांना उत्सुकता आहे.
आघाडी सरकारचा भ्रष्ट कारभारावरच पुणेकरांच्या कोणत्या स्थानिक प्रश्नांचा राज ठाकरे आजच्या भाषणात उल्लेख करणार याची उत्सुकता कार्यकर्त्याबरोबरच पुणेकरांमध्ये दिसतीये.
आज पुण्याला रवाना होण्याआधी राज ठाकरे यांनी एकवीरा देवीचं दर्शन घेतलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात राज ठाकरेंच्या राज्यभरात तब्बल ३० सभा होणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.