राज्यसभा

न्यायाधीश नेमणुकीच्या नव्या पद्धतीला राज्यसभेत मंजुरी

सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातल्या न्यायाधीशांच्या नेमणूकीची पद्धत अमुलाग्र बदलणारा कायद्यावर राज्यसभेनंही संमतीची मोहोर उमटवलीय.

Aug 15, 2014, 12:57 PM IST

सचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत

क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.

Jul 21, 2014, 04:33 PM IST

बोकोरो बलात्काराबाबत राज्यसभेत कठोर कारवाईची मागणी

बोकोरो जिल्ह्यात पंचायत समितीच्या आदेशानंतर एका 10 वर्षाच्या मुलीवर सर्वांसमोर बलात्कार केल्याचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. राज्यसभेत खासदारांनी हा मुद्दा मांडला. या घृणास्पत घटनेबाबत निंदा करण्यात आली. पंचायतीचा मोरक्याविरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी केली.

Jul 12, 2014, 04:31 PM IST

तेलंगणा विधेयकावर राज्यसभेत जोरदार आक्षेप

राज्यसभेत तेलंगणा राज्य निर्मितीचा मुद्दा जोरदार गाजला. विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयक गुरुवारी दुपारी राज्यसभेत सादर केले. यावेळी विरोधक खासदारांनी तेलंगणा विधेयकाचा निषेध करत सभागृहात जोरदार गोंधळ केला.

Feb 20, 2014, 07:43 PM IST

राज्यसभा निवडणूक : सात जागा, सात उमेदवार

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय.

Jan 28, 2014, 12:58 PM IST

काँग्रेस राज्यसभेचे उमेदवार जाहीर

राष्ट्रवादी आणि भाजपने आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आज काँग्रेसने आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेसने आधीच्याच उमेदवारांना उमेदवारी दिला आहे.

Jan 26, 2014, 10:25 PM IST

आठवलेंना जॅकपॉट... राज्यसभेसाठी उमेदवारी!

राज्यसभेसाठी रामदास आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. २८ जानेवारीला आठवले राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील.

Jan 25, 2014, 06:38 PM IST

राज्यसभेच्या सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला

राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या 7 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, तर शिवसेना-भाजपचा प्रत्येकी 1 उमेदवार सहज निवडून येणार आहे. परंतु सातव्या जागेसाठी चुरशीची निवडणूक रंगणार असून, एखाद्या उद्योगपतीच्या गळ्यात ही जागा पडेल, अशी चिन्हं सध्या तरी दिसतायत...

Jan 22, 2014, 09:33 PM IST

राज्यसभेसाठी आज महायुतीचं विचारमंथन, जागावाटपाचं सूत्र ठरणार?

सेना भाजप, आरपीआय आठवले गट आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी सेतकरी संघटना यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत रंगशारदा इथं संध्याकाळी होत आहे.

Jan 14, 2014, 09:47 AM IST

राज्यसभेच्या सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान

महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठविण्यात येणार्याम सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं सोमवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्यानं तेही या निवडणुकीत उभं राहण्याची शक्यता आहे.

Jan 14, 2014, 09:19 AM IST

रिपाइंमध्ये अस्वस्थता, आठवलेंच्या पदरात नेमकं पडणार काय?

लोकसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या असतानाही जागावाटपाबाबत काहीही चर्चा होत नसल्याबद्दल महायुतीतल्या रिपाइंमध्ये अस्वस्थता आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर कार्यकत्यांचा दबाव वाढतोय.

Dec 31, 2013, 08:59 PM IST

लोकपाल विधेयक मंजुरीनंतर अण्णांचा केजरीवालांना चिमटा

लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर होताच नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अण्णांनी सोडलं. शाळेतल्या विद्यार्थिनीच्या हातून अण्णांनी ज्यूस घेतलं. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राळेगणवासियांनी जल्लोष केला. या जल्लेषात स्वत: अण्णाही सहभागी झाले.

Dec 18, 2013, 06:35 PM IST

लोकपाल विधेयक आज संमत होण्याची शक्यता

लोकपाल आणि जादूटोणा विरोधी विधेयक आज संमत होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लोकपाल विधेयकाला तातडीनं मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतलाय.

Dec 17, 2013, 09:43 AM IST

राज्यसभेत लोकपालवर मतदान? शिवसेनेचा विरोध

संसदेच्या या अधिवेशनातच लोकपाल विधेयक संमत करावं, त्यासाठी गरज पडल्यास अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा लागला तरी वाढवावा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलंय. आज अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकार परिषद घेतली.

Dec 15, 2013, 08:29 PM IST