दिल्ली गँगरेप : `एसआयटी` तात्काळ करणार कारवाई - गृहमंत्री
दिल्ली गँगरेप प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रकरणात ठोस पावलं उचलली जातील, असं आश्वासन बुधवारी राज्यसभेत दिलंय.
Dec 19, 2012, 02:01 PM ISTराज्यसभा : `एफडीआय`चा निकाल परिक्षेअगोदरच जाहीर
लोकसभेपाठापोठ राज्यसभेतही एफडीआयचा मार्ग मोकळा होणार आहे. बसपा अध्यक्ष मायावतींनी राज्यसभेत एफडीआयच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केलीय. तर लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही सभात्याग करणार असल्याचं सपानं स्पष्ट केलंय. यामुळे एफडीआयच्या अग्निपरीक्षेत सरकार पास होणार हे नक्की झालंय.
Dec 7, 2012, 01:13 PM ISTइंदू मिलच्या हस्तांतरणाची संसदेत घोषणा
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज दादरच्या इंदू मिलच्या हस्तांतरणाची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय.
Dec 5, 2012, 12:38 PM ISTसंसदेत सलग चार दिवस कामकाज ठप्प
एफडीआयच्या मुद्दयावर संसदेत पुन्हा गदारोळ झाला. एफडीआयच्या मतदानाच्या मागणीवर भाजप ठाम आहे. या गदारोळात राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. संसदेचे सलग चार दिवस कोणतेही कामकाज होवू शकलेले नाही.
Nov 27, 2012, 01:04 PM ISTस्त्रीभ्रूण हत्या: आमिर जाणार राज्यसभेत
आमिर खान प्रोडक्शननिर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खाननं स्त्री भ्रूण हत्येच्या गंभीर विषय मोठ्या सामंजस्यानं हाताळला होता. हाच विषय राज्यसभेत मांडण्यासाठी आमिरला आमंत्रण देण्यात आलंय आणि आमिरनं ते स्विकारलंही आहे.
Jun 20, 2012, 03:02 PM ISTसचिन तेंडुलकरच्या गावात जल्लोष
क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरनं खासदारकीची शपथ घेतल्याचे समजताच त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील हर्चे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र त्याचबरोबर खासदार झाल्यावर तरी सचिननं वेळ काढून गावात यावे आणि गावाच्या समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवाव्यात, अशी प्रामाणिक इच्छा गावकरी बाळगून आहेत.
Jun 5, 2012, 12:49 PM ISTसचिनच्या खासदारकीने मांजरेकर हैराण
देशात बदल घडवण्याइतका वेळ तरी तो राज्यसभेला नक्कीच देऊ शकतो. पण सचिन खूपच साधा आहे. तो क्रिकेटचे प्रश्नही राज्यसभेत मांडू शकणार नाही." असं मांजरेकर म्हणाले
Apr 27, 2012, 07:10 PM IST'समाजवादी'कडून राज्यसभेसाठी जया बच्चन
समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी बिग बीच्या सौभाग्यवती आणि बॉलिवूडमधून राजकारणात गेलेल्या जया बच्चन यांनी अर्ज दाखल केला आहे.
Mar 17, 2012, 03:47 PM ISTलोकपाल विधेयक लटकले
राज्यसभा संस्थगित झाल्यानं लोकपाल विधेयक लटकले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक येण्याची शक्यता आहे. गुरुवारी गोंधळात कामकाज तहकूब झाल्यानं आता राज्यसभेत लोकपालच्या मंजुरीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत वाट पहावी लागणार आहे.
Dec 31, 2011, 03:40 PM ISTलोकपाल - ४२ वर्षांनंतरही चर्चेचं गुऱ्हाळ
लोकपालवर राज्यसभेत थोडीथोडकी नाही, तर तब्बल १३ तास चर्चेचे घमासान रंगले. विरोधक सरकारवर तुटून पडले, तर सत्ताधा-यांकडून सरकारी लोकपालचं समर्थन करण्याची जय्यत मोर्चेबांधणी झाली. मात्र, या राजकीय आखाड्यात फक्त चर्चा आणि चर्चाच रंगली, लोकपाल मात्र पुन्हा एकदा लटकलं.
Dec 30, 2011, 05:30 PM ISTराम जेठमलानी यांचा सनसनाटी आरोप
स्वीस बँकेत भारताच्या एका माजी पंतप्रधानांचा काळा पैसा आहे, असा सनसनाटी आरोप गुरूवारी राज्यसभेत ज्येष्ठ कायदा पंडित आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी केला.
Dec 30, 2011, 10:38 AM ISTशिवसेनेचा लोकपालला विरोध – मनोहर जोशी
लोकपाल विधेयकांने समांतर सत्ताधिकारण निर्माण होऊन हा देशासाठी धोका असल्याचं मत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार मनोहर जोशी यांनी आज लोकपालावरील चर्चेच्या वेळी बोलताना सांगितले.
Dec 29, 2011, 06:34 PM ISTसरकारी लोकपालची राज्यांवर गदा - जेटली
केंद्राच्या सरकारी लोकपालमुळे राज्य सरकारांच्या अधिकारांवर गदा येण्याची भीती आहे. लोकपाल विधेयकातल्या विसंगतींवर भाजपाचे अरूण जेटली यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी सक्षम लोकपाल आणण्याची मागणी त्यांनी केली.
Dec 29, 2011, 01:32 PM ISTलोकपाल बिलावर राज्यसभेत घमासान
लोकपाल बिलावर आज राज्यसभेत घमासान चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेतल्या नामुष्कीनंतर काँग्रेसचे जुळवा-जुळवीचे प्रयत्न सुरू आहेत. एसपी-बीएसपीच्या हातात सरकारची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे लोकपाल बिलाचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
Dec 29, 2011, 11:23 AM ISTलोकसभेत महागाईवरून हंगामा
लोकसभा आणि राज्यसभेत महागाई आणि तेलंगणा राज्याच्या मुद्यावरून गोंधळ निर्माण झाला.
Nov 24, 2011, 10:13 AM IST