लोकपाल विधेयक राज्यसभेत, विधेयक मंजूर होणार?
लोकपाल विधेयक मंजुरीसाठी सरकार आज राज्यसभेत मांडण्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक शुक्रवारी म्हणजे आज चर्चेला आणवं अशी मागणी केलीय. दरम्यान, भाजपने विरोध केलाय तर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.
Dec 13, 2013, 07:47 AM ISTजोशी भेटले मोदींना, राज्यसभेवर डोळा!
शिवसेनेचे माजी खासदार डॉ. मनोहर जोशी यांनी आता पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावलीय. जोशीसरांनी आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची गांधीनगरमध्ये जाऊन सदिच्छा भेट घेतली.
Dec 3, 2013, 10:35 PM ISTसचिन `खासदार` सोनियांमुळेच - राजीव शुक्ला
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच राज्यसभेत नियुक्ती करण्यासाठी सचिनचे नाव सुचविले होते. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. सचिन २००वी कसोटी खेळून नवृत्त होणार असला तरी सरकार निवृत्तीनंतर त्याला `भारतरत्न` हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्याबाबत विचार करू शकते, असे संकेतही शुक्ला यांनी दिले आहेत.
Nov 13, 2013, 05:55 PM ISTरिपाईला तीन जागा सोडण्याची युतीची तयारी
महायुतीतील तिसरा पार्टनर असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेच्या तीन जागा सोडण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलीय.
Oct 4, 2013, 07:38 PM ISTझी मीडिया इम्पॅक्ट; मराठ्यांचा इतिहास संसदेत
‘सीबीएससी’च्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मराठ्यांचा इतिहास अवघ्या दीड पानात गुंडाळल्याचा मुद्दा आज संसदेत गाजला.
Sep 5, 2013, 04:18 PM ISTअन्न सुरक्षा विधेयक राज्यसभेत मंजूर
यूपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक राज्यसभेत मंजूर झालंय.राज्यसभेत थोड्याच वेळापूर्वी झालेल्या मतदानात हे विधेयक मंजूर करण्यात आलं.
Sep 2, 2013, 11:54 PM IST...आणि पंतप्रधानांनी मौन सोडलं!
रुपयाची ढासळलेली पत आणि अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेर मौन सोडलंय.
Aug 29, 2013, 02:45 PM ISTअन्नसुरक्षेसाठी काँग्रेसचा खासदारांना ‘व्हिप’
सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या महत्त्वाकांशी अन्नसुरक्षा विधेयकासाठी आज लोकसभेत चर्चा होणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. अन्नसुरक्षा विधेयकासह आणखीही काही महत्त्वपूर्ण विधेयकं आज, लोकसभेत मांडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या विधेयकांच्या मंजुरीसाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. अधिवेशन संपेपर्यंत सर्व खासदारांना दररोज हजर राहण्यासाठी काँग्रेस ‘व्हिप’ जारी केलाय.
Aug 26, 2013, 08:22 AM ISTसंसदेत किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद!
काश्मीरमधल्या किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद संसदेत उमटलेत. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांना आधी बोलू देण्यावरून सरकारी बाकांवरून गोंधळ घातला गेला. त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं.
Aug 12, 2013, 02:42 PM ISTसंसदेतल्या गोंधळानंच केलं सचिनचं स्वागत!
राज्यसभेचा खासदार असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याची दिवशी राज्यसभेत हजेरी लावली. पहिल्याच दिवशी सचिन संसदेत हजर असल्यानं अर्थातच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
Aug 5, 2013, 03:37 PM ISTगोंधळातच संसदेचं कामकाज सुरू
स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावरुन गोंधळातच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू झालं. गोंधळातच पहिले १२ आणि नंतर २ वाजेपर्यंत राज्यसभेचं कामकाज स्थगित झालं.
Aug 5, 2013, 01:29 PM ISTखासदारकी १०० कोटीत, काँग्रेस नेत्याचा बॉम्बगोळा
राजकारणात काय चालतं, याचे दाखले निवडणून आलेले लोकप्रतिनिधी देत आहे. खासदारकीच्या निवडणुकीत आपल्याला आठ कोटी रुपये खर्च करावे लागल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. त्यावरून बरेच वादळ उठले. आता तर केंद्रात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसच्याच नेत्यांने खासदारकी १०० कोटी रूपयात मिळते, अशी धक्कादायक कबुली दिली.
Jul 29, 2013, 04:02 PM ISTबलात्कारविरोधी बिल : लोकसभेतून राज्यसभेत!
बलात्कारविरोधी बिल लोकसभेत मंजूर झालंय. हे बिल आज राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हे बिल लोकसभेत मांडलं.
Mar 20, 2013, 11:09 AM IST‘योजनांचा सुकाळ, राज्यात मात्र दुष्काळ’
दुष्काळावर राज्यसभेत उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारी योजनांवर खापर फोडलंय.
Mar 8, 2013, 02:05 PM ISTभंडारा हत्याकांडाचे पडसाद राज्यसभेत, CBI चौकशी करा
भंडारा जिल्ह्यातल्या तीन बहिणींवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे राज्यसभेतही पडसाद उमटले. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी याप्रकरणी निवेदन केलं.
Mar 1, 2013, 02:31 PM IST