सोनं हे महिलांसाठी खूप जास्त जिव्हाळाचा विषय असतो. सोनं हे सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक असून दिवसेंदिवस त्याची किंमत वाढत आहे. तरीदेखील सोनं खरेदीचा ग्राहकांचा ओघ कमी होताना दिसत नाही. कारण भारतात सोनं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यासोबत भारतात सोनं हे प्रतिष्ठेच मानल जातं. लग्न सोहळ्यात सोन्याच मंगळसूत्राला अतिशय महत्त्व आहे. भारतात अगदी प्रत्येक घरात थोडं फार प्रमाणात का होई ना प्रत्येकाकडे सोन्याचे दागिने असतात. सोन्याचे दागिने महाग असतात. पण सोनं हरवलं किंवा चोरीला गेलं तर त्यामागे काही तरी संकेत असतात असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. सोनं हरवणे हे शुभ असतं की अशुभ काय सांगत शास्त्र जाणून घ्या. (Losing gold is auspicious or inauspicious What does the loss of which jewel indicate astrology news )
ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचा संबंध गुरू ग्रहाशी जोडला गेला आहे. गुरूला देव गुरु बृहस्पती असेही म्हणतात. गुरु हा शुभ ग्रह मानला गेला असून हे ज्ञान, प्रशासन, उच्च स्थान, आनंद आणि समृद्धीचे प्रतिक मानलं गेलं आहे.
सोन्याचा संबंध सुख-समृद्धीशीही असतो, अशावेळी सोनं हरवणे म्हणजे नुकसान होणे, हे शुभ मानले जात नाही. शकुन शास्त्रानुसार सोने हरवणे हे दुर्दैवाचे लक्षण मानले गेले आहे. यासोबतच हे बृहस्पति कमकुवत होण्याचे लक्षण देखील सांगण्यात आलंय. बृहस्पतिच्या कमकुवतपणामुळे जीवनात उच्च स्थान प्राप्त करण्यात अडचण निर्माण होते. शैक्षणिक क्षेत्रात अडथळ्यांना सामोरे जावे लागतं. यासोबतच वैवाहिक जीवनातही अडचणी येतात. पोटाशी संबंधित आजार होण्याची भीती असते. जर सोने हरवले तर गुरू ग्रहाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
गळ्यातील सोने गमावणे - हे संपत्तीच्या नुकसानीचे लक्षण असतं.
सोन्याचे ब्रेसलेट गमावणे - हे आदर गमावण्याचे लक्षण असतं.
सोन्याची अंगठी गहाळ होणे - सोन्याची अंगठी हरवल्यास आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
नाकातील सोने हरवणे - हे अपमानाचे लक्षण मानले जाते.
कानातले हरवले - कानात घातलेले सोने हरवले तर काही अशुभ वार्ता मिळण्याचे संकेत असतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)