लोकपाल विधेयक आज संमत होण्याची शक्यता

लोकपाल आणि जादूटोणा विरोधी विधेयक आज संमत होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लोकपाल विधेयकाला तातडीनं मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 17, 2013, 09:57 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकपाल आणि जादूटोणा विरोधी विधेयक आज संमत होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लोकपाल विधेयकाला तातडीनं मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतलाय.
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनंही या विधेयकास पाठिंबा दिलाय. त्यामुळे लोकपाल विधेयकावर आज राज्यसभेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकपाल विधेयक आज मंजूर झालं तर अण्णा हजारे आपले उपोषण आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे. लोकपालबाबत अण्णा हजरे समाधानी आहेत.
जनलोकपाल विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा होणार आहे. हे विधेयक मंजूर व्हावे यासाठी देशवासियांनी जनतेला आवाहन करावं, अशी भूमिका अण्णा हजारे यांनी घेतलीय. तर दुसरीकडे समाजवादी पार्टी या विधेयकाला जोरदार विरोध करणार असल्याचं सपाचे नेते रामगोपाल यादव यांनी स्पष्ट केलय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.