राज्यसभा निवडणूक : सात जागा, सात उमेदवार

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 28, 2014, 12:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय.
राज्यसभेच्या सात जागांसाठी ही निवडणूक होतेय. महत्त्वाचं म्हणजे, या सात जागांसाठी सातच उमेदवार रिंगणात उतरणार असल्यानं ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. माजिद मेमन यांना उमेदवारी देण्यात आलीय. काँग्रेसतर्फे मुरली देवरा व हुसेन दलवाई या दोघा मावळत्या खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आलीय.
शिवसेनेच्या वतीनं उद्योगपती राजकुमार धूत यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. भाजपच्या कोट्यातून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना तिकीट देण्याचं निश्चित झालंय तर सातवे अपक्ष उमेदवार म्हणून उद्योगपती संजय काकडे आखाड्यात उतरलेत.
निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार असली तरी आठवा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता नाही. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी गेल्या शुक्रवारीच निवडणूक बिनविरोध होणार असल्याची सूतोवाच केलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.