मुंबई कुणाची? महायुती आघाडीला सुरूंग लावणार?
मुंबई कुणाची? याचा फैसला गुरूवारी होणाराय... मुंबईतील सहा मतदारसंघात उद्या गुरुवारी मतदान होतंय. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने या सहाच्या सहा जागा जिंकल्या होत्या. आघाडी यंदाही ती किमया कायम राखणार की, महायुती आघाडीला सुरूंग लावणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.
Apr 22, 2014, 10:44 PM ISTराहुल गांधी गरिबीची थट्टा करतात, मोदींचा हल्लाबोल
बीकेसीमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी माँ-बेटेकी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. या सरकारमध्ये कुठलंही उत्तर देण्याची हिंमत नाही, हे फक्त गरिबीची थट्टा करतात आणि राहुल गांधी गरिबीचं टुरिझम करतात, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि भाषणात सुरुवातीलाच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
Apr 21, 2014, 09:29 PM IST`उद्धट` लोकांसाठी मी ही उद्धट, उद्धव ठाकरेंचं पवारांना प्रत्युत्तर
मुंबईत आज महायुतीची सभा झाली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि सरकारवर कडाडून टीका केली. महाराष्ट्रातील जनता नरेंद्र मोदींना निराश करणार नाही. आम्ही निवडणुकीसाठी ढाणे वाघ रिंगणात उतरवले आहेत. ते कुठंही कमी पडणार नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विजयाचा विश्वास बोलून दाखवला.
Apr 21, 2014, 09:11 PM ISTभुजबळांना धक्का; सिन्नरच्या `वाघा`चा महायुतीला पाठिंबा
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना महिनाभरात तिसरा धक्का बसलाय. काँग्रेसचे सिन्नर पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांनी महायुतीच्या उमेदवारांला पाठिंबा दिलाय.
Apr 11, 2014, 10:46 AM ISTमहायुतीचा अपेक्षाभंग होऊ शकतो का?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर असतानाच राज्यातील आघाडी आणि महायुती यांच्यात कडवी झुंज दिसुन येत आहे.
Apr 8, 2014, 01:29 PM ISTयुतीसाठी एक फोन करायचा होता - राज ठाकरे
महायुतीत मनसेला घ्यायचंच होतं, तर हा बाहेर किंवा वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेलवर चर्चा करण्याचा विषय नव्हता, असं स्पष्ट करत मला जर एक फोन केला असता तर मी चर्चा करण्यासाठी तयार झालो असतो, असे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पुण्यातील पहिल्या जाहीर सभेत आपली भूमिका स्पष्ट केली. मनसेनं आपला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. माझी अवकात काढलीत ना तर आता मी या निवडणुकीत अवकात दाखवून देईन, असे राज म्हणालेत.
Apr 1, 2014, 10:04 AM IST`मनसे`मुळेच युतीत होता तणाव, उद्धव ठाकरेंची कबुली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेमुळेच काही काळ भाजपमध्ये आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता याची कबुली दिलीय. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा अंतिम भाग आज `सामना` या शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रकाशित झाला. या मुलाखतीच्या अखेरच्या भागात जनतेच्या मनातील ‘मनसे’पासून ‘हिंदुत्वा’पर्यंतच्या अनेक प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तरे दिली आहेत.
Apr 1, 2014, 09:32 AM ISTकाँग्रेसचे सर्व नेते `आदर्श`, मोदींनी नांदेडमध्ये सुनावलं
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमरावती, अकोलानंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी काँग्रेसचे नांदेडचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना `आदर्श` प्रकरणावरून चांगलंच सुनावलं. तसंच काँग्रेस सरकारवरही टीका केली.
Mar 30, 2014, 04:20 PM ISTसामनातून उद्धव ठाकरेंनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सामनातून मुलाखत दिलीय. यात त्यांनी लोकसभा निवडणुकांचं महत्त्व स्पष्ट केलंय.‘‘ही लढाई केवळ स्वार्थासाठी नाही, तर देशासाठी आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू,’’ असा निर्धार त्यांनी केलाय! शिवसेनेतून जे निवडणुकीच्या तोंडावर गेले ते एकटेच गेले. ते नुसतेच नाममात्र होते
Mar 30, 2014, 09:14 AM ISTमहायुतीत सहावा भिडू दाखल
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसंग्राम सेनेचे अध्यक्ष विनायक मेटे महायुतीत दाखल झाले आहेत.
Mar 28, 2014, 05:47 PM ISTमेटेंना महायुतीत घेणार? सेना नेत्यांचा विरोध
शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना महायुतीसोबत घेऊ नये, असा शिवसेना नेत्यांचा कल असल्यानं आज मेटेंच्या मातोश्री भेटीचा आणि वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहातला सोहळा रद्द करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली.
Mar 27, 2014, 10:21 PM ISTमुख्यमंत्री झालो तरच येणार - गोपीनाथ मुंडे
‘महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येणार असून, मीच मुख्यमंत्री होणार आहे,`` असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केलं. ते धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. याआधी मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता ते पद मिळालं तर घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणूनच येणार, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलंय.
Mar 16, 2014, 01:22 PM ISTउद्धव ठाकरेंची गडकरी आणि मनसेवर टीका
महाराष्ट्रात भाजपमध्ये नेमके अधिकार कुणाला, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. शिवसेना-भाजप युतीमध्ये सगळं गुण्यागोविंदानं सुरू असताना बिब्बा टाकला जातो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गडकरींचं नाव न घेता टीका केलीय.
Mar 11, 2014, 04:49 PM ISTशिवसेनेची समजूत काढण्यासाठी भाजपची धावाधाव
भाजप आणि मनसेतल्या वाढत्या जवळीकीमुळं नाराज झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपची धावाधाव सुरू झालीयं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहेत.
Mar 11, 2014, 12:56 PM ISTमनसेला महायुतीत घेण्याची वेळ निघून गेलीय - मुंडे
`मनसेला महायुतीत घेण्याची वेळ आता निघून गेलीय` असं म्हणत महायुतीत निर्माण झालेला नवा वाद थंड करण्याचा प्रयत्न भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.
Mar 5, 2014, 04:35 PM IST