महायुतीत धुसफूस.. पाच जागांसाठी ढसाळ आग्रही
काल आघाडीचा मेळ बसला. मात्र महायुतीमध्ये अजुनही धुसफूस ही सुरूच आहे. दलित पँथरचे नामदेव ढसाळ यांनी मुंबईत पाच जागांची मागणी केल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
Jan 11, 2012, 08:52 AM ISTमहायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप जाहीर झालं आहे. महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेला १३६ तर भाजपला ६२ आणि आरपीआयला २९ जागा देण्यात आल्या आहेत. रामदास आठवलेंनी ३० जागांची अपेक्षा व्यक्त केली होती तर सेना-भाजपने २५ जागांची तयारी दर्शवली होती. अखेरीस आरपीआयच्या वाट्याला २९ जागा आल्या आहेत.
Jan 9, 2012, 03:46 PM ISTनामदेव ढसाळांचा इशारा
शिवसेना, भाजप आणि रिपाई यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळ यांनी आमच्या रामदास आठवले यांना आमच्या जागांबाबत ११ तारखेपर्यंत निर्णय घ्या असा निर्वाणीचा इशारा दिला.
Jan 9, 2012, 03:20 PM ISTमहायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम
रामदास आठवले ३० जागांवर ठाम राहिल्याने महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना-भाजपने आठवलेंच्या रिपाईला २९ जागांचा प्रस्ताव दिला. रिपाईच्या कोट्या संदर्भातही वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळांनी रिपाईच्या कोट्यातील पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. तसंच ढसाळांनी रामदास आठवलेंना या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ११ जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे
Jan 9, 2012, 12:36 PM ISTRPIच्या नेत्यांना मस्ती चढली आहे- नामदेव ढसाळ
आरपीआयच्या नेत्यांना मस्ती चढली आहे असं जळजळीत विधान नामदेव ढसाळ यांनी केलं आहे. यापुढे दलित पँथर आरपीआयमध्ये राहणार नाही अशी घोषणाही ढसाळांनी केली. तसंच माझी नाराजी शिवसेनेवर नाही असंही त्यांनी सांगितलं.
Jan 6, 2012, 09:59 AM ISTRPI ला २५ जागा देण्यावर शिक्कामोर्तब
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला २५ जागा देण्यावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला असून याबाबत रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Jan 5, 2012, 07:39 PM IST