मुख्यमंत्री झालो तरच येणार - गोपीनाथ मुंडे

‘महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येणार असून, मीच मुख्यमंत्री होणार आहे,`` असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केलं. ते धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. याआधी मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता ते पद मिळालं तर घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणूनच येणार, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 16, 2014, 01:22 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, पुणे
‘महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येणार असून, मीच मुख्यमंत्री होणार आहे,`` असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केलं. ते धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. याआधी मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता ते पद मिळालं तर घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणूनच येणार, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलंय.
धनगर मेळाव्यात पुढं बोलतांना गोपीनाथ मुंडे यांनी त्यांनी ओबीसींसाठी आतापर्यंत दिलेल्या लढ्याचीही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळातर्फे आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश शेंडगे होते. यावेळी मुंडे म्हणाले, "मी १९७८पासून धनगर समाजासाठी लढलो. या समाजाच्या चळवळीचा मी अविभाज्य घटक आहे. सत्ता आल्यानंतर धनगर आणि धनगड याबाबत झालेला गोंधळ दूर करू. ओबीसी जनगणनेचा प्रश्नक संसदेत मीच मांडला. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचं ठरत होतं. छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांना ही माहिती दिली. त्या वेळी उघडपणे बोलण्यास कोणी तयार नव्हतं. त्या वेळी मीच पत्रकार परिषद घेऊन उघडपणे बोललो. ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहे. पण, मराठा समाजाला राजकीय आरक्षण देऊ देणार नाही.``
आपल्या कामाचा आढावा दिल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचीही स्तुती केली. शिवाय भाजपचे नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असून देशात पहिल्यांदाच ओबीसी पंतप्रधान होईल, असंही मुंडे म्हणाले.
राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये तावडे, खडसे, शेंडगे या नेत्यांनाही महत्त्वाची खाती देण्यात येईल, असंही मुंडेंनी जाहीर केलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला color="blue">फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.