काँग्रेसचे सर्व नेते `आदर्श`, मोदींनी नांदेडमध्ये सुनावलं

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमरावती, अकोलानंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी काँग्रेसचे नांदेडचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना `आदर्श` प्रकरणावरून चांगलंच सुनावलं. तसंच काँग्रेस सरकारवरही टीका केली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 30, 2014, 04:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नांदेड
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमरावती, अकोलानंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी काँग्रेसचे नांदेडचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना `आदर्श` प्रकरणावरून चांगलंच सुनावलं. तसंच काँग्रेस सरकारवरही टीका केली.
महायुतीच्या मराठवाड्यातील सभेच्या भाषणाला मोदींनी मराठीतून सुरूवात केली. यावेळी सभेला शिवसेना, भाजप, आरपीआयचे अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र मोदींनी अशोक चव्हाणांना आदर्शवरून जोरदार टोला मारला. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करू असं म्हणणाऱ्या राहुल गांधी यांनी अशोक चव्हाणांना का तिकीट दिलं? असा सवाल विचारत हीच का त्यांची कारवाई, असा टोला काँग्रेसला हाणलाय.
शहीदांच्या विधवांना लुटणाऱ्यांना कठोर शासन करू असं मोदी म्हणाले. अशोक चव्हाणांनी भास्करराव खतगावकरांचा पत्ता कापत आपल्या पत्नीचं माहेरच लुटलं, अशा शब्दात अशोक चव्हाणांना त्यांनी टोला मारला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.