बाळासाहेबांसाठी ठाण्यात राजचे ‘एक पाऊल पुढे’
ठाण्याच्या जनतेने शिवसेना-भाजप युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे ठाण्यात विकासाच्या मुद्द्यावर मी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा देत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट करून एका वेगळ्या समीकरणाची सुरूवात केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या इच्छेमुळेही मी युतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Mar 6, 2012, 05:25 PM ISTउपमहापौरपदासाठी सेना X भाजप
नागपूरमध्ये उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. भाजपनं महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर केलेत. तर शिवसेनेनं उपहापौरपदासाठी अलका दलाल यांना उमेदवारी दिली.
Mar 1, 2012, 07:25 PM ISTनागपुरात महायुतीत तणाव
नागपुरात महायुतीत तणाव निर्माण झालाय. नागपूरच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजपनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हा अर्ज दाखल करुन भाजपनं एकप्रकारे उपमहापौरपद शिवसेनेला देण्यास विरोध केलाय.
Mar 1, 2012, 01:42 PM ISTयुतीने केली माती – शरद पवारांची टीका घणाघाती
मुंबईत गेल्या १६ वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे, परंतु त्यांच्यामुळे मुंबई बकाल झाली. मुंबईत पर्यटकांची संख्या कमी झाली असून मुंबईत आता परिवर्तनाची गरज असल्याचा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आघाडीच्या सभेत हाणला.
Feb 9, 2012, 10:33 PM ISTमहायुतीच्या वचननाम्यातही आश्वासनांचा पाऊस!
मुंबई महापालिकेवर सत्तेत असलेल्या महायुतीने आज आपला वचननामा जाहीर करून मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. शिवसेना भवनात आयोजित एका पत्रकार परिषदेत महायुतीने हा वचननामा जाहीर केला.
Feb 9, 2012, 05:27 PM ISTतर महायुती तोडू – आरपीआय
पुण्यात आरपीआयनं महायुती तोडण्याचा इशारा दिलाय. भाजपच्या आडमुठेपणामुळे युती तुटू शकते, असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिलाय.
Jan 29, 2012, 11:18 PM ISTनाशिकमध्ये युतीला भगदाड
नाशिकमध्ये महायुती फुटली आहे. शिवसेना भाजपमधील नेत्यांच्या वादामुळे महायुतीत फुट पडल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकमध्ये आता बहुरंगी लढत होऊन शिवसेना-रिपाइं विरुद्ध भाजपचा सामना रंगणार, अशी चिन्हं दिसत आहेत.
Jan 26, 2012, 07:25 PM ISTबाळासाहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही हे दुर्दैव- ढसाळ
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या जागा वाटपांबाबत नामदेव ढसाळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं वचन पाळलं नाही हे दुर्दैव अशी प्रतिक्रिया नामदेव ढसाळ यांनी व्यक्त केली.
Jan 19, 2012, 05:39 PM ISTबाळासाहेब ठाकरे उतरणार मैदानात
निवडणुकीत स्टार प्रचारक उतरण्यावर भरही दिला जात आहे. मनसेने राज ठाकरेंच्या 'होम मिनिस्टर'ना मैदानात उतरविले आहे. आता तर शिवसेनेने ठाणे, मुंबईत सत्ता राखण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मैदानात आणण्याचे ठरविले आहे.
Jan 13, 2012, 05:09 PM ISTमहायुतीची झाली खरी, आठवले नाराज तरी!
मुंबई महापालिकेसाठी महायुतीची घोषणा काही वेळात होणार असली तरी आरपीआयचे नेते रामदास आठवले अजूनही नाराज आहेत. ३० ऐवजी २९ जागांवर समाधान मानल्यानंतर आता काही विशिष्ट वॉर्डासाठी आग्रह धरून त्यांनी दबावतंत्र निर्माण करण्याची खेळी खेळली आहे.
Jan 12, 2012, 06:19 PM ISTमहायुतीत धुसफूस.. पाच जागांसाठी ढसाळ आग्रही
काल आघाडीचा मेळ बसला. मात्र महायुतीमध्ये अजुनही धुसफूस ही सुरूच आहे. दलित पँथरचे नामदेव ढसाळ यांनी मुंबईत पाच जागांची मागणी केल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
Jan 11, 2012, 08:52 AM ISTमहायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप जाहीर झालं आहे. महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेला १३६ तर भाजपला ६२ आणि आरपीआयला २९ जागा देण्यात आल्या आहेत. रामदास आठवलेंनी ३० जागांची अपेक्षा व्यक्त केली होती तर सेना-भाजपने २५ जागांची तयारी दर्शवली होती. अखेरीस आरपीआयच्या वाट्याला २९ जागा आल्या आहेत.
Jan 9, 2012, 03:46 PM ISTनामदेव ढसाळांचा इशारा
शिवसेना, भाजप आणि रिपाई यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळ यांनी आमच्या रामदास आठवले यांना आमच्या जागांबाबत ११ तारखेपर्यंत निर्णय घ्या असा निर्वाणीचा इशारा दिला.
Jan 9, 2012, 03:20 PM ISTमहायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम
रामदास आठवले ३० जागांवर ठाम राहिल्याने महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना-भाजपने आठवलेंच्या रिपाईला २९ जागांचा प्रस्ताव दिला. रिपाईच्या कोट्या संदर्भातही वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळांनी रिपाईच्या कोट्यातील पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. तसंच ढसाळांनी रामदास आठवलेंना या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ११ जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे
Jan 9, 2012, 12:36 PM ISTRPIच्या नेत्यांना मस्ती चढली आहे- नामदेव ढसाळ
आरपीआयच्या नेत्यांना मस्ती चढली आहे असं जळजळीत विधान नामदेव ढसाळ यांनी केलं आहे. यापुढे दलित पँथर आरपीआयमध्ये राहणार नाही अशी घोषणाही ढसाळांनी केली. तसंच माझी नाराजी शिवसेनेवर नाही असंही त्यांनी सांगितलं.
Jan 6, 2012, 09:59 AM IST