www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसंग्राम सेनेचे अध्यक्ष विनायक मेटे महायुतीत दाखल झाले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नाराज असल्याने, विनायक मेटे यांनी महायुतीचा मार्ग निवडला आहे.
विनायक मेटे यांच्या रूपाने आज सहावा भिडू महायुतीत दाखल झाला आहे, यावेळी बोलतांना गोपीनाथ मुंडे म्हणाले, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे, या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणे आवश्यक आहे, असं गोपीमाथ मुंडे यांनी सांगितलं.
तसेच देशाचे कृषीमंत्री शरद पवार म्हणतात, कर्ज माफ करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत. मात्र आमचं सरकार आलं तर गारपीटग्रस्तांना आम्ही मदत करू आणि त्यांचं कर्जही माफ करू, असं गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.