महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडणार?
माढाच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. माढाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्यामुळं, महादेव जानकर नाराज झाले आहेत. महादेव जानकर यांनी माढाच्या जागेचा आग्रह धरलाय.
Feb 16, 2014, 03:56 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात महायुतीचा दुसरा मेळावा
राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात महायुतीचा आज दुसरा मेळावा बीडमध्ये होतं आहे. बीडच्या अटलबिहारी वायपेयी मैदानावर महायुतीची ही सभा होत आहे.
Feb 16, 2014, 03:34 PM ISTमहायुतीचा नव्या भिडुला भक्कम पाठिंबा...
राजू शेट्टी यांना अटक केली तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा महायुतीनं दिलाय. त्यामुळं शेट्टी यांना अटक झाली तर निवडणुकीच्या तोंडावर जोरदार राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत.
Feb 10, 2014, 09:45 PM ISTमहायुतीच्या नेत्यांचं सरकारवर आसूड
महायुतीच्या इचलकरंजीत झालेल्या पहिल्या महासभेत सर्व नेत्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. टोल, वीज, सहकारातला भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा आदी मुद्यांवरून सरकारवर शेतकऱ्यांचा आसूड ओढला. मात्र सर्वांचा टीकेचा रोख होता तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर.
Jan 30, 2014, 10:24 PM ISTमनसेला महायुतीत आणा, भाजप अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
मनसेला सोबत घेऊन निवडणुकीत उतरा असा सल्ला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. जर मनसे सोबत येत नसेल, तर किमान मैत्रिपूर्ण वातावरणात निवडणूक लढवा, म्हणजेच मनसे विरोधात महायुतीच्या विरोधात जाणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Jan 15, 2014, 05:24 PM ISTसत्तेत आल्यावर 'टोलमुक्त महाराष्ट्रा'चं महायुतीचं आश्वासन
‘राज्य सरकारनं महाराष्ट्र टोलमुक्त करावा अन्यथा सत्तेत आल्यावर आम्हीच महाराष्ट्राला टोलमुक्त करू’ असं आश्वासनंच महायुतीच्या नेत्यांनी आज बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं.
Jan 14, 2014, 07:25 PM ISTराज्यसभेसाठी आज महायुतीचं विचारमंथन, जागावाटपाचं सूत्र ठरणार?
सेना भाजप, आरपीआय आठवले गट आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी सेतकरी संघटना यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत रंगशारदा इथं संध्याकाळी होत आहे.
Jan 14, 2014, 09:47 AM ISTखासदार राजू शेट्टी यांनी `त्या` मुद्याला दिली तिलांजली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. पण खासदार राजू शेट्टी यांनी ज्या मुद्यावर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी फारकत घेतली, त्याच मुद्याला आता शेट्टींनी तिलांजली दिल्याचं स्पष्ट होतंय.
Jan 8, 2014, 08:48 PM ISTराजू शेट्टी जातीयवादीच, आव्हाडांची टीका
राजू शेट्टींच्या महायुतीतल्या समावेशावर राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केलीय. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा उघड झालाय. जातीयवादी पक्षांबरोबर जावून आपण जातीयवादी असल्याचं त्यांनी दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
Jan 7, 2014, 07:21 PM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटना अखेर महायुतीत दाखल
महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपाने तिसरा भिडू सामील झाला आहे. लोकसभेसाठी हातकणंगले आणि माढा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात येणार आहे. राजू शेट्टी यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.
Jan 7, 2014, 03:50 PM ISTरिपाइंमध्ये अस्वस्थता, आठवलेंच्या पदरात नेमकं पडणार काय?
लोकसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या असतानाही जागावाटपाबाबत काहीही चर्चा होत नसल्याबद्दल महायुतीतल्या रिपाइंमध्ये अस्वस्थता आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर कार्यकत्यांचा दबाव वाढतोय.
Dec 31, 2013, 08:59 PM ISTठाणे पालिका स्थायी समिती निवडणुकीत चुरस, आघाडीत बिघाडी
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. महायुती आणि आघाडीकडे प्रत्येकी आठ सदस्य असल्यामुळे पुन्हा चिठ्ठी टाकून मतदान होणार होतं. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. तर युतीमध्येही फूट पडलीये.
Oct 8, 2013, 07:24 AM ISTरिपाईला तीन जागा सोडण्याची युतीची तयारी
महायुतीतील तिसरा पार्टनर असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेच्या तीन जागा सोडण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलीय.
Oct 4, 2013, 07:38 PM ISTमहायुतीत चौथा भिडू नकोच- आठवले
महायुतीत चौथा भिडू नको यावर महायुतीतल्या जवळपास सर्वच पक्षांचं एकमत झाल्याचं दिसतंय. रामदास आठवलेंनीही मनसेला दूर ठेवण्याचा पुनरूच्चार केला आहे.
Jun 26, 2013, 05:55 PM ISTराज ठाकरेंनी दिला भाजपला इशारा
माझ्या पक्षाबाबत चर्चा करून नका अन्यथा माझ्याशी झालेली इतर चर्चाही उघड करेल असा गर्भित इशारा आज राज ठाकरे यांनी दिला.
Jun 24, 2013, 07:59 PM IST