महायुती

महायुतीचा चेंडू भाजपकडून शिवसेनेच्या कोर्टात

 महायुतीच्या जागावाटपाचा चेंडू भाजपनं शिवसेनेच्या कोर्टात टोलवलाय. भाजपनं दोन पावलं पुढं टाकली आहेत. शिवसेनेनंही दोन पावलं पुढं यावं असं सांगत युती तोडायची की शाबूत ठेवायची याचा फैसला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेवर सोपवलाय. 

Sep 18, 2014, 06:22 PM IST

अमित शहांचा भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा, युतीबाबत उल्लेख टाळला

भाजपनं एका बाजुला महायुतीच्या जागावाटपाची चर्चा करण्याचा सूर लावला असला तरी दुस-या बाजुला मात्र स्वतंत्र प्रचार सुरू केलाय. भाजप अध्यक्ष अमित शाह प्रचारसभेतल्या भाषणांमध्ये काँग्रेसयुक्त भारतासोबत भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा दिला आहे. गावा-गावात जाऊन भाजप कार्यकर्त्यांचं जाळं सशक्त करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यात.  त्यांच्या कोल्हापूर आणि चौंडीतल्या भाषणांमध्ये महायुतीचं सरकार असा कुठेही उल्लेख नव्हता.

Sep 18, 2014, 06:01 PM IST

मन मोठं करा, युती तोडू नका - राजू शेट्टी

मन मोठं करा, युती तोडू नका - राजू शेट्टी

Sep 17, 2014, 04:10 PM IST

रणशिंंगानंतरही, महायुती-आघाडीच्या घरात आदळआपट

महायुतीतला जागावाटपाचा तिढा अजूनही सुटण्याची चिन्ह नाहीत. जागावाटपाचा जुनाच फॉर्म्युला कायम राहील अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय. 

Sep 14, 2014, 04:42 PM IST

महायुतीतील नेत्यांनी जास्त जागांची हाव धरु नये - शिवसेना

 शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनानं महायुतीतील पक्षांना जागांची जास्त हाव न धरण्याचा इशारा दिलाय. महायुतीतील सर्वच पक्षांनी महायुतीचे राज्य आधी आणावे जागांची हाव न करता ज्याची जेथे ताकद आहे तेथे त्याने लढावे व जेथे कमी जोर आहे तेथे आग्रह न धरता दोन पावले मागे यावे असा इशारा सामनानं अग्रलेखात दिलाय.

Sep 13, 2014, 05:51 PM IST

सत्तेत आल्यानंतर आघाडी सरकारचे 'ते' निर्णय रद्द - फडणवीस

महायुतीची सत्ता आल्यानंतर आघाडी सरकारनं अखेरच्या दीड महिन्यात घेतलेल्या निर्णायांच्या पुनर्विचार करून रद्द करणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. तर रिपाइं नेते रामदास आठवले समजूतदार नेते असल्याचं सांगत आठवलेंचीही समजूत काढण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केलाय. 

Sep 10, 2014, 03:03 PM IST