मराठा आरक्षण

किती दिवस मुख्यमंत्री असेन याची पर्वा नाही पण...

किती दिवस मुख्यमंत्री असेन याची पर्वा नाही, पण परिवर्तनासाठी काम करत राहीन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Sep 25, 2016, 06:01 PM IST

मराठा आरक्षण हिसकावून घेवू, सत्ताधाऱ्यांचा पराभव करा : उदयनराजे भोसले

मराठे मोर्चे हे कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, असे सांगत कोपर्डी प्रकरणातील आरोपींना भर चौकात गोळ्या घाला, असा संताप उदयनराजे भोसले यांनी केला.

Sep 24, 2016, 04:12 PM IST

मराठा मोर्च्यांना आंबेडकर विचारवंतांचा पाठिंबा, प्रति मोर्चे न काढण्याचे आवाहन

मराठा मोर्च्यांना आंबेडकर विचारवंतांनी आपला पाठिंबा दिला आहे. मराठा विरोधात प्रति मोर्चा काढू नका, असे आवाहन आंबेडकर विचारवंतांनी दलित जनतेला केले आहे.

Sep 23, 2016, 07:17 PM IST

मराठा मोर्चाना वाढता प्रतिसाद, शिवसेनेत खलबतं

मराठा मोर्चाना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहाता अन्य राजकीय पक्षांप्रमाणे शिवसेनाही सावध झालीये. या मोर्चाबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी यावर शिवसेनेत खलबतं सुरु झालीयेत. आता मुद्दा हाच आहे की, आरक्षणाबाबातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांनी नेमून दिलेल्या मूळ भूमिकेवरच पक्ष नेतृत्व ठाम राहणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Sep 22, 2016, 04:42 PM IST

मराठा आरक्षणावर भाजप सरकारला राणेंचा गर्भित इशारा

सत्तेतील भाजप सरकारने मराठा आरक्षणासाठी काहीही केलेले नाही. आधी जात मग पक्ष असे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी गंभीर इशारा दिला. वेळप्रसंगी मराठ्यांच्या तलवारी बाहेर येईल.

Sep 21, 2016, 10:45 PM IST

नवी मुंबई, सोलापुरात मराठा समाजाचा भव्य मोर्चा

नवी मुंबईत कोकण भवनावर मुकमोर्चा काढण्यात आला. तर सोलापूरच्या मोर्चालाही उदंड प्रतिसाद मिळाला.

Sep 21, 2016, 07:36 PM IST

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. राज्य सरकार याचिकाकर्त्याचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन त्यानुसार महाराष्ट्र सरकार कार्यवाही करण्यास तयार असल्याचे सुप्रीम कोर्टात सांगणार आहे.

Sep 19, 2016, 12:14 PM IST

शरद पवारांवर आशिष शेलार यांची आगपाखड

 मराठा समाजाच्या मोर्चा प्रकरणात शरद पवारांवर आशिष शेलार यांनी टीका केलीय. पवारांनी या प्रकरणात विनाकारण लुडबूड थांबवावी, अशी आगपाखड शेलार यांनी केली. आधीच्या सरकारने मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतले नाहीत म्हणून ही परिस्थिती आल्याचं ते म्हणाले. 

Sep 17, 2016, 09:48 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात बोलून सहानभूती नको, कृती करा : शरद पवार

मराठा आरक्षणासंदर्भात बोलण्यापेक्षा कृतीची जास्त गरज आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. या सरकारने मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतले नाहीत म्हणून ही परिस्थिती आली आहे, असे मराठा मोर्चावरुन सरकारचे कान टोचले.

Sep 17, 2016, 09:27 PM IST