मराठा आरक्षण

मराठा आरक्षणावर बोलले उद्धव ठाकरे

अजूनही तरतरी असेल तर स्वबळावर लढा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून भाजपला दिलं. तसंच मराठा समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली. आर्थिक निकषांवर जमत नसेल तर जातीच्या आधारे आरक्षण द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मात्र त्याचवेळी इतरांच्या आरक्षणाला धक्का नको असंही ते म्हणाले. त्याचसोबत अॅट्रोसिटी कायद्यात बदल करा आणि गैरवापर करणा-यांना शिक्षा द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

Oct 11, 2016, 09:31 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय मराठा नेत्यांची बैठक

मराठा आरक्षणासंदर्भात 13 ऑक्टोबरपासून उच्च न्यायलयात सुरू होणा-या अंतीम सुनावणीच्या पाश्वभूमीवर वर्षा बंगल्यावर आज सर्वपक्षीय मराठा नेत्यांची बैठक पार पडली. 

Oct 5, 2016, 11:58 AM IST

नारायण राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

Oct 3, 2016, 04:03 PM IST

'मुका मोर्चा'वरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार 'प्रहार'

राज्यात मराठा आरक्षणाबाबत निघणारे मराठे मोर्चे आणि शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या गोटात वादळ उठले. मात्र, हे वादळ क्षमण्याचे नाव घेत नाही. विरोधकांनी शिवसेनेला खंडीत पकडण्याची संधी सोडलेली नाही. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार 'प्रहार' केलाय.

Sep 29, 2016, 09:52 AM IST

मराठा आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या : शरद पवार

मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेऊन सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र इतर समाजांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची दक्षताही घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. 

Sep 28, 2016, 08:42 AM IST

दोन दिवसांत मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या - मुंडे

दोन दिवसांत मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या - मुंडे 

Sep 27, 2016, 08:03 PM IST

सांगलीत मराठा क्रांती मोर्चाची तयारी पूर्ण

मराठा क्रांती मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. 

Sep 27, 2016, 09:37 AM IST