मराठा आरक्षण

मराठा आरक्षणाचं घोंगड भिजत पडण्याची शक्यता

मराठा आरक्षणाचा चेंडू आता मागासवर्गीय आयोगाच्या कोर्टात टोलवला जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास नजिकच्या काळात मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजतच पडेल, अशी चर्चा आहे. 

May 4, 2017, 05:35 PM IST

मराठा आरक्षणाचा विषय मागासवर्गीय आयोगाकडे?

मराठा आरक्षण विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती. 

May 2, 2017, 11:02 PM IST

मराठा आरक्षण : राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश

मराठा आरक्षण विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती. त्यावरून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही, हा मुद्दा प्रवर्ग मागास वर्गीय आयोगाकडे द्यावा की नाही, याचे स्पष्टीकरण सरकारने गुरूवारपर्यंत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

May 2, 2017, 07:13 PM IST

मराठा आरक्षणाची याचिका कुठे चालवायची? उच्च न्यायालयाचा सवाल

मराठा आरक्षण विषय मुंबई न्यायालयात चालावयाचा की राज्य सरकारने स्थापन केलेल्या आयोगासमोर हे २९ मार्च पर्यंत सर्व याचिकाकर्त्यांनी आणि राज्य सरकारने निर्णय घेवून मुंबई उच्च न्यायालयाला कळवावे, असे आदेश हायकोर्टानं दिलेत.  

Feb 27, 2017, 07:14 PM IST

मराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी

मराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी आता 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचं मुंबई हायकोर्टानं सष्ट केले आहे. त्यामुळं मार्च महिन्यात मराठा आरक्षणासंदर्भात निकाल येऊ शकतो. 

Jan 31, 2017, 06:31 PM IST

मराठा आरक्षणासाठी चक्का जाम, राज्यातील महामार्ग रोखल्याने कोंडी

मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यामध्ये मराठा समाजातर्फे आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दहिसर टोल नाक्यावर 500 ते 600 लोकांनी आंदोलनात भाग घेतला. त्यामुळं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुक कोंडी झाली होती. 

Jan 31, 2017, 04:23 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 

Dec 9, 2016, 07:26 PM IST

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची इच्छाशक्ती आहे का ?

राज्यातील आज 32 टक्के  मराठा समाज अपेक्षा ठेवून आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकार निर्णय करणार का ? सरकारची इच्छाशक्ती आहे का ? असा सवाल आज कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या प्रस्तावरच्या विधानसभेत चर्चेवेळी ते बोलत होते. 

Dec 8, 2016, 08:25 PM IST

मराठा आरक्षण श्रेयावरून विनोद तावडे - धनजंय मुंडे यांच्यात खडाजंगी

मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरु झाल्याची पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधान परिषदेत कोण मांडणार यावरुन विनोद तावडे आणि विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

Dec 8, 2016, 04:06 PM IST

मराठा आरक्षणाच्या श्रेयावरून मुंडे आणि तावडे यांच्यात जोरदार खडाजंगी

मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरु झाल्याची पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधान परिषदेत कोण मांडणार यावरुन विनोद तावडे आणि विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

Dec 8, 2016, 04:06 PM IST