मराठा आरक्षणावर बोलले उद्धव ठाकरे

अजूनही तरतरी असेल तर स्वबळावर लढा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून भाजपला दिलं. तसंच मराठा समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली. आर्थिक निकषांवर जमत नसेल तर जातीच्या आधारे आरक्षण द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मात्र त्याचवेळी इतरांच्या आरक्षणाला धक्का नको असंही ते म्हणाले. त्याचसोबत अॅट्रोसिटी कायद्यात बदल करा आणि गैरवापर करणा-यांना शिक्षा द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

Updated: Oct 11, 2016, 09:31 PM IST
मराठा आरक्षणावर बोलले उद्धव ठाकरे title=

मुंबई : अजूनही तरतरी असेल तर स्वबळावर लढा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून भाजपला दिलं. तसंच मराठा समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली. आर्थिक निकषांवर जमत नसेल तर जातीच्या आधारे आरक्षण द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मात्र त्याचवेळी इतरांच्या आरक्षणाला धक्का नको असंही ते म्हणाले. त्याचसोबत अॅट्रोसिटी कायद्यात बदल करा आणि गैरवापर करणा-यांना शिक्षा द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

आर्थिक निकषावर आरक्षण द्या.

इतरांच्या न्यायहक्काला धक्का न लावता आरक्षण द्या.

अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर बदल झाला पाहिजे.

मुसलमान म्हणून नको तर गरीब नागरीक म्हणून सवलती द्या.

मुंबई ही शिवसेनेची आहे. मुंबईवर संकट आल्यावर भगवाच कामी आला.

शिवसेना हा महाराष्ट्रातील सर्वात जुना पक्ष, एक नेता, एक विचार असलेला राज्यात दुसरा पक्ष नाही !

दिवाळीनंतर मी शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत जाणार.

चांगल्या कामात मी राज्य आणि केंद्र सरकारच्या खांद्याशी खांदा लावून काम करणार.

कोणापुढे कटोरा घेवून जाणार नाही पण हक्काचे ते मिळवणारच.

शिवसेना मराठा समाजाच्या पाठीशी.

मराठी चहावल्यावर धाडी टाकताहेत मग मुस्लिम परिसरात धाडी टाकून दाखवा !

पंतप्रधान, मुख्यमंत्री मंत्री पदाची शपथ घेतात मग एकाच पक्षाच्या प्रचाराला कसे जातात ?

25 वर्ष मित्र असलेल्यांनी वार केले त्याबद्दल मला बोलायचे नाही.

भारतीय लष्कराचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जाहीर कौतूक