पुणे

राज्यातील आठ नद्या प्रदूषित

पिंपरी-चिंचवडमधील पवना, इंद्रायणी आणि पुण्यातील मुळा, मुठा या नद्यांची गणना देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं अर्थात सीपीसीबीन नुकत्याच तयार केलेल्या अहवालात देशातील सर्वाधिक ३६ प्रदूषित नद्यांत राज्यातील आठ नद्यांचा समावेश आहे. पालिका प्रदूषण रोखण्यासाठी काय करतेय असा सवाल उपस्थित केला जातोय.

Oct 29, 2012, 09:36 PM IST

नैराश्येवर उपाय भोंदूबाबा नाही!

पुण्यात नैराश्यानं ग्रासलेल्या सुशिक्षित तरुणीला भोंदुगिरीचा चांगलाच फटका बसलाय. दैवी शक्तीच्या जोरावर सगळ्या समस्या सोडवतो, असं सांगणाऱ्या बंगाली बाबानं तरुणीकडून पैसे लुबाडले आणि तिची फसवणूक केली.

Oct 23, 2012, 10:44 PM IST

डेंग्युनं मुंबई-पुणेकरांची उडवली झोप; तिघांचा बळी

यश चोप्रांचा बळी घेणाऱ्या डेंग्यूनं मुंबई आणि पुण्यात हातपाय पसरायला सुरूवात केलीय. मुंबईत डेंग्यूनं तीन जणांचा बळी घेतलाय. तर शहरात आत्तापर्यंत १४१ रुग्णांची नोंद झालीय.

Oct 22, 2012, 04:25 PM IST

अजित पवारांची दमबाजी

‘उत्साहाच्या भरात काहीजण कार्यक्रम घेतात. मात्र, त्याचा काहीवेळा उगाचच पक्षाला धक्का पोहोचतो. पक्षाला धक्का पोहचवेल, असं काम करणाऱ्याला पक्षातून हाकलून दिलं जाईल’ अशी तंबीच आज अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना जाहीरपणे दिलीय.

Oct 21, 2012, 08:52 PM IST

अजितदादांची जागा चालवणार सचिन अहिर

पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नावावर शिकामोर्तब केले आहे. त्यामुळे अहिर हे आता पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

Oct 21, 2012, 12:01 PM IST

नेत्यांनो हिशोब करा – शरद पवार

राज्यात सध्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील सिंचन क्षेत्रात सात टक्क्यांची वाढ झाली आहे. विरोधी पक्षांकडून जलसंपदा खात्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. एखादे काम चुकीचे झाले असेल. त्याला जबाबदार कोण आहे? त्याची चौकशी करा, जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पक्षातील नेत्यांनी कामाबरोबरच पाण्याचा हिशोब केला पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी केली.

Oct 20, 2012, 08:19 PM IST

पुण्यात आजचा दिवस आंदोलनांचा

पुण्यामध्ये आजचा दिवस आंदोलनांचा होता. मनसेनं पाण्यासाठी, आरपीआयनं गॅस दरवाढीविरोधात तर शेतकरी संघटनेनं शेतमालाची निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.

Oct 15, 2012, 05:02 PM IST

आयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या

पिंपरी चिंचवडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडलीय.. प्रियंका मुराडे असं या तरुणीचं नाव आहे. पिंपरी चिंचवडच्या उद्यमनगर परिसरात ती रहात होती.मात्र तिनं लिहलेल्या सुसाईड नोटमुळं आत्महत्येचं गूढ वाढलंय.

Oct 14, 2012, 09:59 PM IST

दिल्लीलाही दूध पाठवी महाराष्ट्र माझा!

रेल्वे.. दोन गावांना, शहरांना जोडणारी...कोट्यवधी लोकांना एकडून तिकडे पोहोचवणारी.. मालाची वाहतूक करणारी... मात्र दौंडची ट्रेन मात्र वेगळी आहे.ही ट्रेन ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलीय. ही आहे दौंडची मिल्क ट्रेन महाराष्ट्रातून दिल्लीकरांना दूध पुरवते.

Oct 8, 2012, 09:11 PM IST

तिहेरी हत्याकांड : कुटुंबप्रमुखाला अटक

वानवडी येथील तिहेरी हत्याकांडानं पुणे हादरले होते. दोन महिला आणि एका लहान मुलीची हत्या करण्यात आली होती. या खूनाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. कुटुंबप्रमुख विश्वजीत मसलकर याला पोलिसांनी अटक केली. त्याने विवाहबाह्य संबंधातून हे हत्याकांड केल्याचे पोलिसांचा संशय आहे.

Oct 6, 2012, 09:32 AM IST

पुण्यात तिहेरी हत्याकांड

पुणे तिहेरी हत्याकांडानं हादरले आहे. दोन महिला आणि एका लहान मुलीची हत्या करण्यात आलीय. वानवडी परिसरातील उदयबागमध्ये ही घटना घडली आहे.

Oct 5, 2012, 01:45 PM IST

तब्बल २८ तास चालली विसर्जन मिरवणूक...

दिर्घकाळ लांबलेली मिरवणूक हेच यावर्षीच्या पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं मुख्य वैशिष्ट्यं ठरलं. तब्बल २८ तासानंतर या मिरवणुकीला पूर्णविराम मिळालाय.

Sep 30, 2012, 06:16 PM IST

बाप्पाच्या निरोपाची लगबग

मुंबई आणि पुणे-नाशिकमध्ये दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाला निरोप देण्याची लगबग सुरू झाली. आज बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबईत आणि पुण्यात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहेत. मुंबईचा मानाचा पहिला गणपती `गणेश गल्लीचा राजा` तर पुण्यात कसबा गणपतीनेही प्रस्थान करण्यास सुरूवात केली आहे

Sep 29, 2012, 11:41 AM IST

गणरायाच्या निरोपाची लगबग...

सुरक्षा आणि बंदोबस्तासाठी पुण्यामध्ये सुमारे १६ हजारांची फौज तैनात असणार आहे. तर, वाहतुकीचे नियोजन म्हणून गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील १४ रस्ते वाहनांसाठी बंद असणार आहेत.

Sep 27, 2012, 08:46 PM IST

पुण्यात पाच मजली बिल्डिंग कोसळली, नऊ ठार

पुण्यात सहकारनगरमध्ये बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झालाय. अजूनही पंधरा जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Sep 24, 2012, 04:16 PM IST