पुणे

पुण्यात मनसेला हादरा, विरोधी पक्षनेते पद गोत्यात

मुंबई महापालिकेतील दणक्यानंतर आता पुण्यातही मनसेला जोरदार धक्का बसलाय. पुणे पालिकेत नगरसेविकेने वयाचा खोटा दाखला दिल्याने तिचे पद रद्द करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पालिकेतील मनसेचे पक्षीय बलाबल कमी होणार आहे. याचा फटका विरोधी पक्षनेते पदावर होण्याची शक्यता आहे.

Mar 14, 2013, 04:27 PM IST

शरद पवारांवर किती गुन्हे, दिल्ली पोलिसांची विचारणा

महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील मोठ व्यक्तीमत्व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, अशी विचारणा दिल्लीतील पोलिसांनी केलीय. मात्र, ही माहिती कशासाठी हवीय त्याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

Mar 13, 2013, 11:58 AM IST

रुपी कोऑपरेटीव्ह बँक दिवळखोरीतून तरणार

पुण्यातली रुपी कोऑपरेटीव्ह बँक एका वर्षाच्या आत पुर्वपदावर आणण्यात येईल, असं आश्वासन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेत दिलंय. या विषयात मांडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.

Mar 12, 2013, 08:08 PM IST

पुण्यातील महिलांनो जरा सावध रहा !

पुणेकरांनो सावधान ! पुण्यामध्ये सोनसाखळी चोरांचा अक्षरश: धुमाकूळ सुरु आहे. महिलांचे सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या एकाच दिवसात ६ घटना घडल्या आहेत.

Mar 7, 2013, 12:37 PM IST

स्टेट बँकेची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी!

पुण्यातल्या हिराबाग चौकामधल्या स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीचं नेमक कारण अजून समजलेलं नाही.

Mar 6, 2013, 08:11 AM IST

देशात मुंबईत सर्वाधिक एड्सचे रुग्ण

देशात एड्स रुग्णांच्या सर्वाधिक संख्येत आर्थिक मुंबईचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामुळे मुंबईत एड्सबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Mar 5, 2013, 03:44 PM IST

मला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका - राज

मी जालन्यात जाहीर केले. मात्र, पुण्यात माझी सभा नाही. तसेच पुण्यात माझा तसा काहीच कार्यक्रम नाही. पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आव्हान दिल्याने मी पुण्यात जाणार असल्याचे जाहीर केलं. कोणीतरी तरी मुर्खासारखे बोलतं, त्यामुळे मी लक्ष घातलं एव्हढच, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.

Mar 4, 2013, 06:04 PM IST

पुण्यात येतोय, रोखून दाखवाच – राज ठाकरे

जालन्याचा विराट सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्याक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जाहीर आव्हान दिलेय. मी आता इथे, २ तारखेला सांगतो, ७ तारखेला पुण्यात येत आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवाच.

Mar 3, 2013, 11:01 AM IST

पुणे-सोलापूर अपघातात १ ठार दोन जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे गाव इथं एक विचित्र अपघातात झाला. या अपघात १ ठार दोन जखमी झाले. एक गॅस टँकर आणि इंडिकामध्ये झालेल्या या धडकेत गॅस टँकरने पेट घेतला.

Mar 3, 2013, 08:06 AM IST

रूपी सहकारी बॅंकेवर निर्बंध, ग्राहकांना फटका

रूपी सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानंतर आजपासून ख-या अर्थानं ग्राहकांना फटका बसायलाय. तर बँकेच्या सहा संचालकांनी आपले राजीनामे परत घेतलेत. तर आपण बँकेच्या नाजूक आर्थिक स्थितीचा इशारा आपण तीन वर्षांपूर्वीच दिला होता, असं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलंय.

Feb 25, 2013, 03:21 PM IST

रूपी सहकारी बॅंकेवर निर्बंध

पुण्यात मुख्यालय असलेल्या आणि राज्यभर ४० शाखा असलेल्या रूपी सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अचानक निर्बंध लादल्यानं ठेवीदारांमध्ये गोंधळ उडालाय.

Feb 24, 2013, 09:17 AM IST

अभिनेत्री प्राची मतेला भावपूर्ण श्रद्धांजली, आपणही द्या श्रद्धांजली

अभिनेत्री प्राची मते हीचे काल कर्करोगाने निधन झाले. अगदी वयाच्या २३ व्या वर्षी निधन झाले. `चार दिवस सासूचे` आणि `अग्निहोत्र` या मराठी मालिकांमधून मराठी प्रेषकांसमोर आली होती.

Feb 20, 2013, 06:24 PM IST

राज नाशिक सुधारा, मग राज्याचं बोला – अजित पवार

नकला करणे, भडक भाषणं करणे, प्रक्षोभक विचार मांडणे ही ठाकरे परिवाराची परंपरा आहे. ते शिवराळ भाषाही वापरतात, पण त्याने ना रोजगार मिळतो ना पाणी. आपल्याजवळ महाराष्ट्रा च्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असल्याचे ते सांगतात, पण आधी त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली नाशिकची महापालिका सुधारून दाखवावी, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.

Feb 20, 2013, 06:03 PM IST

पुण्यात विद्यार्थिनींचा `फॅशन का जलवा....`

जलवा... फॅशन का है ये जलवा ! ह्या गाण्याचे शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर येते ती म्हणजे लटकेबाज रॅम्पवॉक करणारी प्रोफेशनल मॉडेल कंगना राणावत...

Feb 5, 2013, 11:03 AM IST

व्यंगचित्रकार राज ठाकरे!

अखिल भारतीय मराठी व्यंग चित्रकार संमेलनाला पुण्यात सुरुवात झाली. मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले.

Feb 2, 2013, 12:44 PM IST