जखमी दयानंदशी जुळतायत स्फोटाचे धागेदोरे?
स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटील याच्याच पिशवीत स्फोट झाल्यानं, त्याच्याकडून या स्फोटाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची सखोल चौकशी सुरु आहे.
Aug 2, 2012, 04:15 PM ISTपुणे कसं झालं 'टार्गेट', स्फोटांची मालिका....
पुण्यात बुधवारी चार ठिकाणी कमी तीव्रतेचे स्फोट झाले.. या स्फोटानंतर काही वेळानंतर आणखी दोन ठिकाणी स्फोटकं निकामी करण्यात आले. रहदारीच्या ठिकाणी झालेल्या या स्फोटांमुळं पुणेकरांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
Aug 2, 2012, 11:46 AM ISTदर्दी पुणेकरांना मराठी चित्रपट मेजवानी
पुण्यातल्या चित्रपट रसिकांना पुढच्या महिन्यात अनोखी मेजवानी मिळणार आहे. दर्जेदार शंभर मराठी चित्रपट पुण्यातल्या थिएटर्समध्ये दाखवले जाणार आहेत. ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान हा चित्रपट महोत्सव सुरू राहणार आहे.
Jul 31, 2012, 04:15 PM ISTमाधुरी कोणाला म्हणाली 'नॉनसेन्स'?
अभिनेत्री माधुरी दीक्षित आज होणा-या या रक्तदान शिबिराला उपस्थित आहे. यापूर्वी राज्य सरकारचा पुरस्कार स्वीकारायला माधुरी आली नव्हती तेव्हा अजित पवार यांनी भाषणात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर माधुरीने चक्क उपस्थिती लावली आहे. तर या आधी माधुरी मीडियावर घसरली होती. 'नॉनसेन्स' असा उल्लेख केला होता.
Jul 22, 2012, 12:59 PM ISTकसा मिळतो बनावट शस्त्र परवाना
पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्येच खाबूगिरी सुरू असल्याचं उघड झालाय. चक्क पोलीस आयुक्तलयांच्या कार्यालयातूनच बनावट शस्त्र परवाना मिळाल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Jul 21, 2012, 10:10 PM ISTबिल्डरसाठी... प्रशासनाची झाली 'गांधारी'!
पुण्याभोवती डोंगर फोड सुरूच आहे. वारंवारपणे ही बाब उजेडात आणूनही प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे. भूगावमधला डोंगर उद्ध्वस्त करण्याचं कामही असंच सुरू आहे.
Jul 21, 2012, 04:26 PM ISTपुण्याचं पाणी विधानसभेतही पेटलं
पुण्याचं पाणी महाराष्ट्राच्या विधानसभेत पेटलंय. पुण्याचं पाणी दौंडला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर स्थानिक आमदारांनी अजित पवारांविरोधात रोष व्यक्त केला. खडकवासलामध्ये सध्या दोन टीएमसी पाणी आहे. त्यातलं अर्धा टीएमसी पाणी दौंडला सोडण्यात येणार आहे. या निर्णयाला राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्षांचा विरोध आहे.
Jul 19, 2012, 08:54 AM ISTअण्णा-बाबा करणार 'निर्णायक' आंदोलन
लोकपाल, काळापैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी पुन्हा एकत्रित निर्णायक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. ९ ऑगस्टपासून रामदेवबाबा आंदोलन करणार आहेत.
Jul 17, 2012, 12:35 PM ISTपतीने पत्नीचा काढला काटा
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून पतीने तिचा काटा काढल्याची घटना मांढर येथे घडली. विक्रम शंकर शेवते (३२) यांने पत्नी सुनीता (२९) हिला मांढरदेवीच्या दर्शनासाठी नेण्याच्या बहाण्याने महाडजवळील वरंध घाटातील कावळा कड्यावरून लोटून दिले.
Jul 17, 2012, 11:28 AM ISTअजित पवारांच्या सूचनेला कलमाडींचा विरोध
खडकवासला धरणातलं पाणी टंचाईग्रस्त दौंडला देण्याच्या पालकमंत्री अजित पवारांच्या सुचनेला खासदार सुरेश कलमाडींनी विरोध केलाय. पुण्याचं पाणी पुण्यालाच मिळालं पाहिजे अशी भूमिका कलमाडींनी घेतल्यानं, या विषयाला राजकीय रंग चढू लागला आहे.
Jul 15, 2012, 12:48 PM IST... @ ब्लाईंड कॉल सेंटर
कॉल सेंटरवर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या... चित्रपटदेखील आले. मात्र, एका वेगळ्या कॉल सेंटर सध्या पुण्यात पाहायला मिळतंय... हे आहे अंध व्यक्तींचे कॉल सेंटर. टेलिफोन क्षेत्रातील मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीचं काम अंधांच्या कॉल सेंटरला मिळाले आहे. अंध व्यक्तीच या कॉल सेंटरचे सर्व काम यशस्वीपणे हाताळत आहेत.
Jul 12, 2012, 01:17 PM ISTकायद्याच्या आबाचा ढोल!
बातमी पुण्याजवळच्या केशवनगरमधल्या अजब कारभाराची... या गावातल्या अनधिकृत बांधकामांना परवानगी दिल्यानं ग्रामपंचायतींच्या पाच सदस्यांवर निवडणूक लढवण्याची बंदी घातली. तरी हे पाचही जण निवडणूक लढले आणि जिंकलेसुद्धा... कायद्यांची ऐशीतैशी कशी होते आणि भ्रष्टाचारीच पुन्हा कशी सत्ता गाजवतात, याची ही गोष्ट...
Jul 11, 2012, 02:36 PM IST'इथंही एक ढोबळे द्या', म्हणतोय नाना
पुण्यातल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी ‘इथंही एखादा वसंत ढोबळे द्या’, अशा शब्दांत अभिनेता नाना पाटेकर यांनी मुंबईतील एसीपी वसंत ढोबळेंचं कौतूक केलंय.
Jul 11, 2012, 01:24 PM ISTमुजोर खासगी शाळांवर कारवाई होणार?
खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा केंद्र सरकारने केलाय खरा, मात्र, पुण्यातील शाळांनी या कायद्याचा पुरता बोजवारा उडवलाय. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची ही मुजोरी मोडून, गरीब विद्यार्थ्याना शिक्षणाचा हक्क मिळून देण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभाग आणि महापालिकेपुढे आहे.
Jul 5, 2012, 10:00 AM ISTप्राध्यापक राम बापट यांचे पुण्यात निधन
ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक राम बापट यांचे पुण्यात आज पहाटे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. बापट हे राज्याशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक होते. त्यांनी पुणे विद्यापीठासह अनेक महाविद्यालयांमध्ये अनेक वर्ष ज्ञानदानाचे काम केले.
Jul 2, 2012, 05:19 PM IST