पुणे

दोन अपघातांत सात ठार

पुणे आणि नाशिकमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झालाय. पुण्यात मोरगावजवळ एका खाजही बसनं दोघांना चिरडलय. तर नाशिकमध्ये कळवण तालुक्यातील महाल रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून ५ जणांचा मृत्यू झालाय. या अपघातात १० ते १२ जण जखमी झालेत.

May 26, 2012, 10:15 PM IST

रुपयाबरोबर कोलमडलं विद्यार्थ्यांचं बजेट...

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याचा मोठा फटका परदेशी शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना बसलाय. शिक्षणासाठीच्या खर्चात अचानक वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांचं बजेट कोलमडलंय.

May 25, 2012, 05:27 PM IST

गड सर झाला पण...

... पण ‘सागरमाथा’च्या यशाला दुख:ची एक झालर होती. ज्या रमेश गुळवेंनी एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम आखली होती त्यांचाच या मोहिमेदरम्यान मृत्यू झाला.

May 21, 2012, 11:57 AM IST

'हर्ले डेविडसन' क्लबचा अनोखा अंदाज...

हर्ले डेविडसन... बाईक जगतातलं प्रसिद्ध नाव... हर्ले डेविडसनची सवारी रस्त्यावरून निघाली की कोणाचंही लक्ष वेधून घेते. एक-दोन नाही तर तब्बल चाळीस हर्ले डेविडसन एकाच वेळी रस्त्यावरून निघाल्या तर... हे दृश्य पाहण्याची संधी आज पुणेकरांना मिळाली.

May 20, 2012, 07:07 PM IST

प्राण्यांसाठी हायटेक स्मशानभूमी

प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालीकेनं एक स्मशानभूमी बनवली आहे. या स्मशानभूमीत आत्तापर्यंत सोळाशेपेक्षा जास्त पाळीव प्राण्यांचा अंत्यविधी करण्यात आला आहे. आता महापालिकेनं या प्राण्यांच्या दहनाकरिता विद्युत दाहिनीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.

May 13, 2012, 10:56 PM IST

जेव्हा सावलीही सोडून जाते...

तुमची सावली तुम्हाला कधीही सोडून जात नाही असं म्हटलं जातं. आज मात्र हीच सावली काही क्षणासाठी सोडून गेली होती.

May 13, 2012, 10:53 PM IST

पुण्यामध्ये देशातील पहिलं शावोलिन टेंपल

देशातल्या पहिल्या शावोलिन टेम्पलची स्थापना पुण्याजवळ मळवलीत करण्यात आली आहे. मार्शल आर्ट, कुंग फू, तसंच विपश्यनेचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे.

May 12, 2012, 07:03 PM IST

यूपीएससी संपूर्ण निकाल

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे यूपीएससीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार) जाहीर झाला असून त्यात शेना अग्रवाल हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रातून अमृतेश औरंगाबादकर पहिला तर देशात दहावा आला.

May 4, 2012, 07:20 PM IST

'विद्यावती आश्रमा'त लैंगिक शोषण सुरूच?

पुणे जिल्ह्यातल्या विद्यावती अनाथाश्रमातली पापं अजून सुरूच आहेत. या आश्रमात एक अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानं खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलीनं एका मुलीला जन्म दिलाय. पण त्यानंतरही बालविकास अधिका-यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येतोय.

May 3, 2012, 06:28 PM IST

पुणेकरांना राष्ट्रवादीने टोपी घातली

पेट्रोलवरची जकात दोन टक्क्यांवरून एक टक्का करण्याचं आश्वासन पुण्यातल्या राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र , निवडणूक झाल्यावर राजकीय पक्षांना या आश्वासनाचा विसर पडलाय. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं पेट्रोलवरची जकात 1 टक्का कमी करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे.

Apr 25, 2012, 03:40 PM IST

प्रेमाला विरोध, गोळी घालून आत्महत्या

पिपंरी-चिंचवडमध्ये एका १७ वर्षीय तरूणानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या तरूणानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. भावाच्या बंदूकीतून त्यानं ही गोळी झाडून घेतली.

Apr 21, 2012, 10:54 PM IST

मण्णपुरम गोल्डच्या शाखेत जबर दरोडा...

पुण्यातल्या भवानी पेठेतल्या मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेत जबरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्यानं साडे सतरा किलो सोनं, आणि सहा लाख ३४ हजारांची रोकड चोरुन नेली आहे.

Apr 18, 2012, 04:30 PM IST

मुंबईसह महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के

मुंबईला आज सकाळी ११. १ वाजण्याच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला. तर संपूर्ण राज्यात हा भूकंप जाणवला. सकाळी १०.५८ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ४.९ अशी नोंद करण्यात आली आहे.

Apr 14, 2012, 02:42 PM IST

राष्ट्रपतींचा बंगला वादाच्या भोव-यात

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासाठी पुण्यात बांधण्यात येत असलेला बंगला पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे. या बंगल्यासाठी नियमापेक्षा अधिक जागा देण्यात आल्याचा आरोप जस्टीस फॉर जवान या संस्थेनं केलाय. माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली आहे.

Apr 13, 2012, 10:52 AM IST