www.24taas.com,पुणे
मुंबई महापालिकेतील दणक्यानंतर आता पुण्यातही मनसेला जोरदार धक्का बसलाय. पुणे पालिकेत नगरसेविकेने वयाचा खोटा दाखला दिल्याने तिचे पद रद्द करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पालिकेतील मनसेचे पक्षीय बलाबल कमी होणार आहे. याचा फटका विरोधी पक्षनेते पदावर होण्याची शक्यता आहे.
मुंबईत मनसे नगरसेविका गीता बाळा चव्हाण वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. गीता चव्हाण सातांक्रुझ इथल्या वॉर्ड क्रमाकं ९२ मधून ओबीसी आरक्षण कोट्यातून विजयी झाल्या आहेत. गीता चव्हाणा यांनी जात प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करताना बोगस शाळेचा दाखला दिला होता. आता पुण्यात वयाचा खोटा दाखला दिल्याने मनसेची गोची झाली आहे.
पुण्यातील नगरसेविका प्रिया गदादे यांनी आपले वय वाढवून दाखला दिला होता. प्रिया गदादे यांनी वय वाढवून १८ वर्षे केले होते. त्यामुळे त्यांचे वय कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने पद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे पुण्यात मनसेला धक्का बसला आहे. पुणे पालिकेतील विरोधीपक्ष नेतेपद गोत्यात येण्याची शक्यता आहे.