पुण्यात येतोय, रोखून दाखवाच – राज ठाकरे

जालन्याचा विराट सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्याक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जाहीर आव्हान दिलेय. मी आता इथे, २ तारखेला सांगतो, ७ तारखेला पुण्यात येत आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवाच.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 3, 2013, 11:10 AM IST

www.24taas.com,जालना
जालन्याचा विराट सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्याक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जाहीर आव्हान दिलेय. मी आता इथे, २ तारखेला सांगतो, ७ तारखेला पुण्यात येत आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवाच.
राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनी, तुम्ही पुण्यात येऊन दाखवा, असे आव्हान राज ठाकरेंना दिले होते. पुण्यातले काकडे मला, म्हणतात, चार दिवस आधी सांगा पुण्यात येताना. मी आजच सांगतो. मी ७ तारखेला पुण्यात येणार आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा. मनसेची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले जात असून आम्हालाही जसास तसे उत्तर देता येते, हे विसरु नका, असा कडक इशारा राज यांनी दिला.
जसास तसे उत्तर द्यायचे असेल तर गुजरातला द्या. गुजरातमध्येा जसा विकास झाला आहे, तसा विकास महाराष्ट्रा त करा. मी स्वतः हार घालून तुमचा सत्कार करीन, असे खडे बोल राज यांनी उपमुख्यहमंत्री अजित पवार यांना सुनावले. राज यांना महाराष्ट्रातील विकास दिसत नाही. ते नेहमी गुजरात आणि नितीशकुमारचे गोडवे गातात, अशी टीका अजित पवार यांनी केली होती.
शरद पवार दुष्काळाची एवढीच काळजी असेल तर महाराष्ट्रा त आयपीएलचे सामने का ठेवता, असा सवालही राज ठाकरेंनी केला. त्या भास्कर जाधव याची मुलाचा विवाह करताना पैशाची उधळपटी केली म्हणून त्यांना चांगलेच खडसावलेत ना ! मग महाराष्ट्रात होणारे आयपीएलचे सामने रद्द करणार का, असा प्रश्न उपस्थित केला.

राज यांनी शरद पवारांना काही प्रश्नस विचारले. हे प्रश्न त्यांमच्या दृष्टीने पोरकटच आहेत, अशी खोचक टीका करुन राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रालत ३० वर्षांपासून अनेक प्रकल्प् रखडले आहेत. हजारो कोटींचा पैसा वाया गेला आहे. प्रकल्पांच्या किंमती अनेक पटीनी वाढ गेल्यात. तरीही अनेक ठिकाणी प्रत्याक्ष कामाला सुरुवातच झालेली नाही. हे का, याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे.

दुष्काळामुळे आमच्या जनावरांना वा-यावर सोडावे लागत आहे. ही जनवारे खाटीक नेऊन कापतात. अनेकांवर सोने गहाण ठेवून स्थरलांतर करण्याची वेळ आली आहे. ज्यात जनावरांला पोटच्याल गोळ्यासारखे वाढविले, त्यांच्यावर अशी वेळ आली आहे. ही पापं तुम्ही कुठे फेडणार, असा सवाल करत राज ठाकरे म्हणालेत, सत्ता हातात द्या, मग बघा विकास काय असतो ते.