झी २४ तास वेब टीम, नवी मुंबई
परदेशात नोकरीचं अमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या महाठकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मोहंम्मद रफिक मोहंम्मद असं या महाठकाचं नाव आहे.
अनेक बेरोजगार तरूणांच्या समस्येचा अत्यंत योग्यप्रकारे फायदा घेऊन या महाठकाने अनेकांना देशोधडली लावले, मात्र शेवटी आज त्याचावर पोलिसांची झडप पडलीच. त्यानं नवी मुंबई, मुंबई. पुणे, कारवार आणि ठाण्यातल्या अनेक तरुणांना परदेशात नोकरी लावून देतो असं सांगून कोट्यवधी रुपये उकळले होते.
कोपरखैरणेत त्यानं सन टूर एन्ड ट्रॅव्हल्स नावाची कंपनी उघडली होती. सप्टेंबरमध्ये त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून मोहम्मद फरार झाला होता. तो मुंब्रा भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस त्याच्या इतर चार साथीदारांचा शोध घेत आहेत. त्याच्या बँक खात्यात तब्बल ५२ लाख रुपये सापडले आहेत.