ठाणे

नाशिक, नागपुरात बोगस मतदान ; राज्यात अन्य ठिकाणी गोंधळ

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसाठी मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्ये बोगस मतदानाच्या घटना घडल्या आहेत.

Feb 21, 2017, 10:10 AM IST

मतदान करा फरक पडतो: आम्हाला पाठवा तुमचा मतदान 'सेल्फी'

आपल्या देशाचं खरं आभूषण असणाऱ्या लोकशाहीचा सण साजरा करण्याची संधी महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. राज्यात आज 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदा आणि 118 पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आज मतदान होतंय. सकाळी साडे सातवाजता या उत्सावाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडे पाच पर्यंत मतदार राजाला आपला हक्क बजावता येणार आहे. पण गेल्या काही दिवसात मतदार राजा या उत्सवाकडे पाठ फिरवतोय. 

Feb 21, 2017, 09:50 AM IST

सेलिब्रिटींचं मतदान : मतदारांना केलं मतदानाचं आवाहन

10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

Feb 21, 2017, 09:04 AM IST

नाशकात १२२ जागांसाठी ८५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नाशिक महानगर पालिकेच्या १२२ जागांसाठी आज मतदान होतंय. शहरातील दिग्गज आणि नवख्या अशा साऱ्याच उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Feb 21, 2017, 08:45 AM IST

३ कोटींहून अधिक मतदार बजावणार आपला हक्क

 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झालीय. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

Feb 21, 2017, 08:22 AM IST

मुंबई, ठाणे, पुण्यासह 10 महापालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी आज मतदान

मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदां आणि 118 पंचायत समित्यांमध्ये आज मतदान होत आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल.

Feb 21, 2017, 07:23 AM IST

ठाण्यात शिवसैनिकांचं ठिय्या आंदोलन

मयूर शिंदे, आणि त्याच्या गुंडांना त्वरित अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. 

Feb 20, 2017, 12:35 AM IST

'ठाण्यातली शिवसेना आनंद दिघेंची राहिली नाही'

ठाण्यामधील शिवसेना ही आता आनंद दिघेंची राहिली नसून ती नातेवाईकांची आणि स्वार्थी लोकांची शिवसेना झाली असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Feb 19, 2017, 08:48 PM IST

सुप्रिया सुळेंची बुलेटवारी वादात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही पालिका प्रचारा दरम्यान, मुंबई-ठाण्यातल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे प्रचारसभा स्थानी पोहोचण्याकरता, सुप्रिया सुळे यांना आपला लवाजमा बाजूला ठेऊन, चक्क दुचाकीवरुन प्रवास करावा लागला. पण असं केल्यामुळे आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

Feb 16, 2017, 11:46 PM IST

भिवंडीत काँग्रेस नेत्याची क्रूर हत्या

भिवंडी महानगर पालिकेच्या काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आलीय. 

Feb 15, 2017, 12:20 AM IST

शिवसेनेतील प्रवेश नाट्य, चव्हाण - टाक समर्थकांत वाद

महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. ठाण्यातील शिवाईनगर परिसरातील अपक्ष उमेदवार सुधाकर चव्हाण यांचे समर्थक गणेश टाक यांनी अचानक शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली.

Feb 14, 2017, 08:45 AM IST

भाजपला साथ दिली तर दिव्याचा विकास : मुख्यमंत्री फडणवीस

भाजपच्या हाती सत्ता दिली तर दिव्यातलं डंपिंग ग्राऊंड बंद करूच तसेच इथे विकासकामे केली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवावासियांना दिले आहे. 

Feb 11, 2017, 08:09 PM IST

उल्हासनगरमध्ये सात उमेदवारांना जीवे मारण्याच्या धमक्या

उल्हासनगरमध्ये सात उमेदवारांना जीवे मारण्याच्या धमक्या

Feb 9, 2017, 03:02 PM IST