ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही पालिका प्रचारा दरम्यान, मुंबई-ठाण्यातल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे प्रचारसभा स्थानी पोहोचण्याकरता, सुप्रिया सुळे यांना आपला लवाजमा बाजूला ठेऊन, चक्क दुचाकीवरुन प्रवास करावा लागला. पण असं केल्यामुळे आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
सुप्रिया सुळे ज्या बाईकवर सवार होत्या त्या बाईक चालकाने हेल्मेट घातलं नव्हतं. शिवाय त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर कार्यकर्त्यांनी देखील हेल्मेट घातलं नव्हतं. सुप्रिया सुळे या लोकप्रतिनिधी आहेत. त्या लोकसभेमध्ये खासदार आहेत.
हेल्मेट न घालता गाडी चालवण्यावर १०० रुपये दंड आहे. मुंबई वाहतूक पोलीस आणि आरटीओ यावर आता काय कारवाई करेल हे पाहावं लागेल.
पाहा व्हिडिओ
<